शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयचे शिक्षणक्रम आता विद्यार्थीच ठरवणार, विषय सुचविण्यासाठी स्पर्धा

By संतोष भिसे | Updated: October 31, 2022 16:30 IST

विद्यार्थ्यांनी कालसुसंगत शिक्षणक्रम सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सांगली : आयटीआयमध्ये कोणते विषय शिकविले जावेत याची निवड आता विद्यार्थ्यांवरच सोपविण्यात आली आहे. विषय सुचविण्यासाठी १ ते ११ नोव्हेंबरदरम्यान रितसर स्पर्धाही जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कालसुसंगत शिक्षणक्रम सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शासकीय व खासगी आयटीआयमध्ये सध्या विविध प्रकारचे ४० शिक्षणक्रम शिकविले जातात. त्यापैकी मोजके दहा-बारा ट्रेडच लोकप्रिय आहेत.  तरीही यावर्षी सर्वच शासकीय आयटीआयमधील सर्वच ट्रेडचे प्रवेश फुल्ल झाले आहेत. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याच्या काळात विद्यार्थ्यांना नवनवी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन आयटीआयमध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस सुरु करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला. स्वत: शिक्षणक्रम तयार करुन विद्यार्थ्यांपुढे ठेवण्याऐवजी त्यांनाच निर्णयाची संधी देण्यात आली.`सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम` ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली. राज्यातील प्रत्येक तालुक्यातून सर्वोत्कृष्ट विषयानुसार एका विद्यार्थ्याची निवड केली जाईल. त्यासाठी तेथील प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त केली आहे. तालुकास्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांमधून १८ व १९ नोव्हेंबररोजी जिल्हास्तरीय निवड केली जाईल. सर्वोत्कृष्ट संकल्पना असलेल्या तिघांची निवड होईल. त्यांना अनुक्रमे ५०००, ३००० व २००० रुपयांची बक्षिसे दिली जातील.

यावर शिक्षणक्रम अपेक्षित आहेतशेती, स्वयंरोजगार, महिलांचे रोजगार, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यासक्रम व अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सुचवता येतील. तो कसा उपयुक्त आहे हेदेखील सांगायचे आहे.

शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थी लगेच स्वत:च्या पायावर उभा राहणे अपेक्षित आहे. त्यासाठी समाजात गरज असलेल्या विषयांचे शिक्षणक्रम सुरु केले जाणार आहेत. त्यासाठी समाजातूनच विषय यावेत असा स्पर्धेमागील हेतू आहे. - व्ही. बी. देशपांडे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीiti collegeआयटीआय कॉलेज