शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी आता दोनच केंद्रांचा पर्याय, ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात 

By अविनाश कोळी | Updated: February 13, 2024 12:52 IST

जात प्रमाणपत्र जोडावे लागणार नाही

अविनाश कोळीसांगली : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या ‘नीट २०२४’साठीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून दि. ९ मार्च २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यंदाच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत. पूर्वी चार परीक्षा केंद्रांचे पर्याय निवडता येत होते. आता दोनच केंद्रांचे पर्याय असतील. याशिवाय अर्जासोबत जोडावा लागणारा जातीचा दाखला आता प्रवेशावेळी सादर करण्याची मुभा आहे.

संपूर्ण देशात ५ मे २०२४ रोजी दुपारी २ ते ५.२० या वेळेत ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. सर्वाधिक परीक्षार्थी असणारी ‘नीट’ ही देशातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा आहे. गतवर्षी २० लाख ८७ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केला होता. यंदा २२ लाखांहून अधिक विद्यार्थी नीट परीक्षा देतील, असा अंदाज आहे.

यंदा प्रवेश प्रक्रियेत या गोष्टी बदलल्या

  • यापूर्वी चार परीक्षा केंद्र द्यायला लागायचे त्याऐवजी या वर्षापासून फक्त दोनच परीक्षा केंद्र द्यावे लागणार असून त्यापैकी एक परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
  • राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र जोडावे लागत असे, या वर्षापासून ते जोडावे लागणार नाही. मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ते सादर करावे लागणार आहे.

महाराष्ट्रात ३४ परीक्षा केंद्रइंग्रजीसह १३ प्रादेशिक भाषेत नीट परीक्षा देता येणार असून यासाठी देशभरात ५५४ केंद्र असणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात ३४ परीक्षा केंद्र आहेत. नीट परीक्षेचा निकाल १४ जून २०२४ रोजी जाहीर केला जाणार आहे.

नीट परीक्षेचा फॉर्म विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक भरावा. तसेच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे योग्य त्या आकारात अपलोड करावीत. नीट परीक्षेसाठी भरली जाणारी माहिती नंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करताना आहे तशी वापरली जाते. त्यामुळे नीट परीक्षेसाठी अर्ज करताना केली जाणारी एखादी चूक वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर विपरीत परिणाम करू शकते. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीMedicalवैद्यकीयexamपरीक्षा