शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

साडेआठशे व्यापाऱ्यांना नोटिसा

By admin | Updated: March 17, 2016 23:36 IST

प्रश्न एलबीटीचा : आठ व्यापाऱ्यांनी दीड कोटी बुडविले

सांगली : एलबीटीपोटी व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे सादर केलेल्या विवरणपत्रात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे. पालिकेने नियुक्त केलेल्या सीए पॅनेलकडून विवरणपत्राची छाननी सुरू आहे. त्यात प्रक्रिया पूर्ण केलेल्या आठ प्रकरणात दीड कोटी रुपयांचा कर बुडविल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, महापालिकेने ८६० व्यापाऱ्यांना विवरणपत्र सादर करण्यासाठी नोटीस बजाविली आहे. महापालिका क्षेत्रात ११ हजार नोंदणीकृत व्यापारी आहेत. एलबीटीअंतर्गत सुमारे ३३०० व्यापाऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. दोन वर्षात ५६०० व्यापाऱ्यांनी एलबीटी भरला होता. २०१३-१४ या वर्षात ४७३०, तर २०१४-१५ या वर्षात ३७०० व्यापाऱ्यांनी विवरणपत्र सादर केले. या विवरणपत्राच्या तपासणीसाठी पालिकेने के. के. चलानी आणि कंपनी मुंबई, राजेश भाटे व श्री. बुकटे या तीन कर सल्लागारांची नियुक्ती केली आहे. या कर सल्लागारांकडून दाखल विवरणपत्राची तपासणी करून अंतिम मूल्यांकन निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी मार्चपर्यंत ५० कोटींचे टार्गेट दिले आहे. सल्लागारांना वसुलीच्या पाच टक्के मोबदला व प्रत्येक विवरणपत्रामागे ५०० रुपये मानधन दिले जाणार आहे.कर सल्लागारांकडून आतापर्यंत ६०० विवरणपत्रांची छाननी झाली आहे. आतापर्यंत विवरणपत्र सादर न करणाऱ्या ८६० व्यापाऱ्यांना पालिकेने नोटिसा बजाविल्या आहेत. छाननी झालेल्यापैकी ५४ विवरणपत्रांचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आले आहे, तर आठ व्यापाऱ्यांच्या विवरणपत्राचे मूल्यांकन निश्चित करून त्यांना नोटीस बजाविण्यासाठी आयुक्तांची मान्यता घेतली जात आहे. ही फाईल आठ दिवसांपासून आयुक्तांकडे प्रलंबित आहे. गुरुवारी स्थायी समिती सभेत नगरसेविका निर्मला जगदाळे यांनी एलबीटी वसुलीबाबत प्रश्न उपस्थित केला. व्यापाऱ्यांकडून थकित एलबीटी वसुलीसाठी प्रशासनाने कोणताही दबाव घेऊ नये, पालिकेच्या हितासाठी सर्व सदस्य प्रशासनाच्या पाठीशी राहतील, अशी ग्वाही दिली. सभापती संतोष पाटील यांनी दर आठवड्याला वसुलीचा अहवाल सादर करण्याचे आदेश एलबीटी विभागाला दिले. तसेच उपमहापौर विजय घाडगे, शेखर माने यांनी, एलबीटी विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. यात थकित एलबीटी वसुलीसाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, पण व्यापाऱ्यांना नाहक त्रास देऊ नये, अशी सूचना केली. (प्रतिनिधी)