शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिस्त न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा : मिरज पंचायत समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:00 IST

मिरज : मिरज पंचायत समितीत शिस्त न पाळणाºया २२ कर्मचाºयांना सक्त कारवाईच्या नोटिसा बाजविण्यात आल्या. वारंवार सूचना देऊनही त्या धुडकाविल्या जात असल्याने प्रशासनाकडून या नोटिसा दिल्या.

ठळक मुद्देसीईओंकडून झाडाझडती, वरिष्ठ अधिकाºयांच्या भेटीत वाढ

मिरज : मिरज पंचायत समितीत शिस्त न पाळणाºया २२ कर्मचाºयांना सक्त कारवाईच्या नोटिसा बाजविण्यात आल्या. वारंवार सूचना देऊनही त्या धुडकाविल्या जात असल्याने प्रशासनाकडून या नोटिसा दिल्या. यामध्ये कर्मचाऱ्यांबरोबरच काही अधिकाºयांचाही समावेश आहे. मिरज पंचायत समितीतील कामकाजात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. या तक्रारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनापर्यंत पोहोचल्याने अलीकडे पंचायत समितीत जि. प. वरिष्ठ अधिकाºयांच्या भेटीत वाढ झाली आहे.

जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी पंचायत समितीस भेट देऊन अपुरे कामकाज व दिरंगाईबाबत विभागप्रमुखांची झाडाझडती घेतली होती. राऊत यांच्यानंतर नव्याने दाखल झालेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी घुले यांनी पंचायत समितीस भेट दिली होती. या भेटीत त्यांनाही अशाच पध्दतीच्या कारभाराचा अनुभव आला. त्यांनी सायंकाळी साडेचारच्या सुमारास पंचायत समितीस भेट दिली होती. कर्मचारी ओळखपत्राशिवाय त्यांच्यासमोर वावरत होते.

घुले हे थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसल्यानंतर कर्मचाºयांना व अधिकाºयांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी आल्याचे समजताच वेळेपूर्वी घरी जाण्याच्या तयारीत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. घुले यांनीही विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी अधिकारी व कर्मचाºयांकडे ओळखपत्र नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ओळखपत्र बाळगण्याची सूचना दिली.

मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी वारंवार सूचना देऊनही ओळखपत्र सक्तीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पालन होत नसल्याने सहायक गटविकास अधिकारी संजय शिंदे यांनी पंचायत समितीतील प्रत्येक विभागाला अचानक भेटी दिल्या.या भेटीत त्यांना अधिकारी व कर्मचारी अशा २२ जणांकडे ओळखपत्र नसल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या सर्वांना सक्तीच्या कारवाईच्या नोटिसा बाजवल्या. या कारवाईनंतर दुसºया दिवसापासून ओळखपत्र दिसू लागले आहे.टपरीवरील कर्मचाऱ्यांनाही नोटिसामिरज पंचायत समितीच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत चहा टपरीवर वेळ घालविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सदस्यांची मागणी आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन पंचायत समिती प्रशासनाकडून चारजणांना सक्तीच्या कारवाईच्या नोटिसा बाजविण्यात येणार असल्याचे सहायक गटविकास अधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले. गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक गटविकास अधिकारी संजय शिंदे यांनी कठोर भूमिका घेतल्याने पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना शिस्त लागू लागली आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण