शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेबाबत नोटीसयुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:43 IST

थकीत कर्जप्रकरणी जिल्ह्यातील बड्या संस्थांच्या मालमत्तांचा प्रतिकात्मक ताबा घेतल्यानंतर, अशा मालमत्तांचे फेरमूल्यांकन जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेबाबत ताबा नोटीस प्रसिद्ध केल्याने बँक आॅफ इंडियाला नोटीस पाठविण्याची तयारी जिल्हा बँकेने केली आहे.

ठळक मुद्देमाणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेबाबत नोटीसयुद्धजिल्हा बँकेच्यावतीने मालमत्तांचे फेरमूल्यांकन

सांगली : थकीत कर्जप्रकरणी जिल्ह्यातील बड्या संस्थांच्या मालमत्तांचा प्रतिकात्मक ताबा घेतल्यानंतर, अशा मालमत्तांचे फेरमूल्यांकन जिल्हा बँकेच्यावतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेबाबत ताबा नोटीस प्रसिद्ध केल्याने बँक आॅफ इंडियाला नोटीस पाठविण्याची तयारी जिल्हा बँकेने केली आहे.आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे जिल्हा बँकेकडील सुमारे १०६ कोटींचे कर्ज थकीत आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी बॅँकेने कारखान्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. यात कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा समावेश आहे. मात्र याच कारखान्याला ६७ कोटींच्या कर्ज वसुलीसाठी बॅँक आॅफ इंडियानेही प्रतिकात्मक ताबा घेतल्याची नोटीस प्रसिद्ध केली आहे. याला जिल्हा बॅँकेने हरकत घेतली आहे.

या कारखान्याला पहिले कर्ज जिल्हा बॅँकेने दिले आहे, त्यामुळे कारखान्याची सर्व मालमत्ता जिल्हा बॅँकेकडे तारण आहे. अशा परिस्थितीत बॅँक आॅफ इंडियाने त्याच मालमत्तेवर दुसरे कर्ज कसे दिले? असा सवाल जिल्हा बँकेने केला आहे. त्यामुळे बँक आॅफ इंडियाची कारवाईची प्रक्रिया चुकीची व बेकायदेशीर असल्याबद्दलची नोटीस त्यांना जिल्हा बॅँक बजाविणार आहे. यास बँकेच्या सूत्रांनी दुजोरा दिला.जिल्हा बॅँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी १० बड्या संस्थांवर सिक्युरिटायझेशनची कारवाई केली आहे. या संस्थांना याबाबत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या नोटिसांची मुदतही संपली आहे. त्यामुळे या संस्थांचा आता बॅँकेच्यावतीने प्रतिकात्मक ताबा घेतला जात आहे.

माणगंगा, महांकाली साखर कारखान्यासह अन्य काही संस्थांचा प्रत्यक्षात प्रतिकात्मक ताबा बॅँकेने घेतला आहे. मात्र आता या दोन कारखान्यांसह थकीबाकीदार असलेल्या अन्य संस्थांच्या मालमत्तेचे जिल्हा बॅँकेकडून फेरमूल्यांकन केले जाणार आहे. या कारखान्याच्या मालमत्तांची सध्याची किंमत तपासण्यात येणार असून त्यानंतर तातडीने या संस्थांच्या बाबतीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSangliसांगली