शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

माजी संचालकांना नोटिसा

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

जिल्हा बँक : १५७ कोटींचा गैरव्यवहार; आरोपपत्र दाखल होणार

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील १५७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी १०२ माजी संचालक, त्यांचे वारसदार, अधिकारी यांना आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. २१ मे रोजी यावर चौकशी अधिकारी संपतराव गुंजाळ यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. त्यानंतर आरोपपत्र दाखल केले जाईल. या घोटाळ्यातही जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी आहेत. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या दिग्गज नेत्यांवर या घोटाळ्याची टांगती तलवार लटकत आहे. लवकरच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ७२ (३) नुसार माजी संचालकांवर आरोपपत्र ठेवले जाणार आहे. त्यावर पुन्हा सुनावणी, जबाबदारी निश्चिती आणि कारवाईच्या शिफारशीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. ही प्रक्रिया अजून चालणार असली तरी, तत्कालीन माजी संचालकांच्या मालमत्तेची माहितीही संकलित झाली आहे. १०२ लोकांना चौकशी अधिकाऱ्यांनी २१ मे रोजी म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. यापूर्वी सरसकट सर्व अनियमित कामांसाठी सर्वांना नोटिसा बजावल्या जात होत्या. आता त्या-त्या नियमबाह्य कामांना जबाबदार असणाऱ्या माजी संचालक, त्यांचे वारसदार व अधिकारी यांना स्वतंत्र नोटिसा बजावल्या आहेत. यावर सुनावणी झाल्यानंतर प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. सहकार विभागाने त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. दोन वर्षापूर्वी जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली होती. बँकेच्या संचालक मंडळाच्या कालावधित नियमबाह्य कर्जवाटपाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली. या चौकशीत २१ संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप करून १५० कोटी व १७ संस्थांना एकरकमी कर्ज परतफेड योजनेतून ७ कोटी ९ लाखांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सुनावणी झाली. या सुनावणीला माजी संचालकांनी आक्षेप घेत सहकारमंत्र्यांसमोर अपील केले होते. तत्कालीन सहकारमंत्र्यांसमोर चारवेळा सुनावणी होऊनही त्यांनी निर्णय घेतला नाही. त्यामुळे माजी संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सहकारमंत्र्यांकडील अपिलावर तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जानेवारी २०१५ मध्ये याविषयीची सुनावणी घेऊन, कलम ८८ च्या चौकशीचा मार्ग खुला करण्यात आला होता. आता याच कलमान्वये चौकशी पूर्ण झाली आहे. आता आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)