शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

वादग्रस्तच नव्हे, सर्व प्रकारचे लोक संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:50 IST

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी केवळ वादग्रस्तच नव्हे, तर सर्वच प्रकारचे लोक भाजपच्या संपर्कात आहेत. निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष लावून आम्ही अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेऊ, असे विधान जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.ते म्हणाले की, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा आमचा ...

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी केवळ वादग्रस्तच नव्हे, तर सर्वच प्रकारचे लोक भाजपच्या संपर्कात आहेत. निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष लावून आम्ही अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेऊ, असे विधान जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केले.ते म्हणाले की, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा आमचा निर्णय झाला आहे. त्यासंदर्भातील नियोजन सुरू आहे. पक्षात येऊ पाहणाºयांना आम्ही प्रवेश देणार आहोत. निवडून येण्याचाच निकष त्यांना लावण्यात येणार आहे. अन्य कोणत्याही निकषावर त्यांची परीक्षा नाही. वादग्रस्तच नव्हे, तर सर्वच प्रकारचे लोक भाजपच्या संपर्कात आहेत. सर्वांशीच आम्ही चर्चा करू. सर्वांचे समाधान होईल, असे निर्णय घेतले जातील. देशमुख यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर नवे वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे नेते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेच्या मतदारांना १ लाख भेटवस्तू वाटपाचे विधान केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर चोहोबाजूंनी टीकास्त्र सोडले जात आहे. काँग्रेस, जिल्हा सुधार समिती, शिवसेना, नागरिक हक्क संघटना अशा अनेक पक्ष, संघटनांनी त्यांचा निषेध केला होता. अशातच महापालिका निवडणुकीविषयी देशमुख यांनीही वादग्रस्त व्यक्ती संपर्कात असल्याचे मान्य करुन नव्या वादास तोंड फोडले आहे.सांगली महापालिका निवडणुकीत प्रत्येकवेळी वादग्रस्त व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांचा विषय चर्चेत येतो. ज्या पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतील, ते टीकेचे धनी होत असतात. राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनीही सांगलीत एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नगरसेवकांच्या पोस्टरबाजीवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत अशा उमेदवारांचा आणि नगरसेवकांचा विषय चर्चेला येत असतो. यंदा चांगल्या राजकीय कार्यकर्त्यांसह काही वादग्रस्त कार्यकर्तेही भाजपच्या संपर्कात आले आहेत.त्यांनी पक्षप्रवेशाकरिता स्थानिक भाजप नेत्यांना साकडे घातले आहे. अद्याप त्यांच्याविषयी निर्णय झाला नसला तरी, देशमुख यांनी त्यांच्यासाठीही केवळ निवडून येण्याच्या क्षमतेचा निकष लावल्याचे स्पष्ट केले.