शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोणीही गेले तरी बहुमत आमचेच

By admin | Updated: February 10, 2017 00:06 IST

जयंत पाटील : काळमवाडी येथे राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारास प्रारंभ

नेर्ले : कोणी कितीही सोडून गेले, तरी बहुमतापर्यंत पोहोचण्यास फारशी अडचण नाही. ही निवडणूक महत्त्वाची आहे़ आपापसातील गट-तट, मतभेद बाजूला ठेवून प्रचाराला लागा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. याचवेळी त्यांनी भिन्न विचार, आचार, कर्तृत्वाचे लोक एकमेकाला कडकडून मिठ्या का मारीत आहेत? हे न कळण्याइतपत वाळवा तालुक्यातील जनता खुळी नाही, या शब्दात विकास आघाडीच्या नेत्यांना फटकारले. काळमवाडी (ता. वाळवा) येथे आमदार पाटील यांच्याहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, माजी आमदार मानसिंगराव नाईक, कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, जिल्हा मध्य़ बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, जनार्दनकाका पाटील, पी़ आऱ पाटील, बी़ के. पाटील, विष्णुपंत शिंदे, सभापती रवींद्र बर्डे, डॉ़ प्रताप पाटील, प्रा़ सुकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.आ़ पाटील म्हणाले, सर्वांना विश्वासात घेऊन, बऱ्याच चर्चा करून उमेदवारी निश्चित केली आहे़ तरीही सर्वांना उमेदवारी देणे शक्य नाही़ पश्चिम भागात काँग्रेसशी आघाडी करताना काहीजणांना थांबावे लागेल़ समजून घ्या़. जिल्हा परिषदेत आपली सत्ता असल्याने आपण वाळवा तालुक्यासह जिल्ह्यात अनेक विकासकामे करू शकलो आहे़ देवराज पाटील, रणजित पाटील, लिंबाजी पाटील या तरुण सहकाऱ्यांनी चांगले काम केलेले आहे़ मला जिल्ह्यात प्रचारासाठी फिरावे लागणार असल्याने महत्त्वाच्या सभांना बोलवा़ यावेळी त्यांनी भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगत सरकारच्या धोरणावर हल्ला चढविला़ सत्यजित देशमुख म्हणाले, आम्ही चारही जागा जिंकून विजयाची नांदी करू़ या मंडळींच्या भूलथापांना बळी पडू नका़ दिलीपराव पाटील, माणिकराव पाटील, जनार्दनकाका पाटील, पी़ आऱ पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, सौ़ सुस्मिता जाधव, उद्योगपती दिनकर पाटील, वैभव शिंदे, सौ़ सुनीता देशमाने यांनीही मनोगत व्यक्त केले.तालुकाध्यक्ष बी़ के़ पाटील यांनी स्वागत केले़ याप्रसंगी प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, देवराज पाटील, लिंबाजी पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, झुंझारराव शिंदे, सौ़ भाग्यश्री शिंदे, नेताजीराव पाटील, प्रताप पाटील, जगन्नाथ पाटील, ग़ चि़ ठोंबरे, संजय कोरे, रघुनाथ पाटील, सोमराज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. लक्ष्मण सावंत यांनी आभार मानले़ अजित बारवडे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)