शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

बाजार आवारात ओळखपत्राशिवाय प्रवेश बंदी, वैयक्तिक खरेदीदारास प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 10:33 IST

CoronaVirus Sangli : कोविड -19 विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने दिनांक 15 एप्रिल 2021 पासून कोरोना ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. बाजारात फळे व भाजीपाला खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असून त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्दे विष्णुआण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात ओळखपत्राशिवाय प्रवेश बंदीवैयक्तिक खरेदीदारास प्रवेश बंद

सांगली : कोविड -19 विषाणूचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने दिनांक 15 एप्रिल 2021 पासून कोरोना ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. बाजारात फळे व भाजीपाला खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होत असून त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे.

यास्तव विष्णुआण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात दिनांक 21 एप्रिल 2021 पासून फळ विक्रेते, व्यापारी व संबंधितांना ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. तसेच वैयक्तिक खरेदीदारास बाजार आवारात प्रवेश बंद करण्यात आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी सांगितले.विष्णुआण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार सांगली येथे गर्दी टाळण्यासाठी सर्व आडत्या/व्यापारी, होलसेल खरेदीदार, हमाल बांधव, दिवाणजी, तोलाईदार यांना बाजार समितीमार्फत ओळखपत्रे देण्याबाबत यापुर्वीच प्रशासनामार्फत सुचना देण्यात आल्या आहेत. बाजार समितीमार्फत ओळखपत्रे देणेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ज्या व्यक्तींनी अद्याप ओळाखपत्रे घेतली नाहीत त्यांनी तात्काळ बाजार समितीशी संपर्क साधून ओळखपत्र प्राप्त करुन घ्यावीत. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे.ओळखपत्र असल्याशिवाय विष्णुआण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवार, कोल्हापूर रोड सांगली येथे कोणालाही प्रवेश मिळणार नाही. तरी बाजार समितीशी संबधित असलेल्या सर्व घटकांनी ओळखपत्रांसाठी फळमार्केट येथील बाजार समितीचे कार्यालयाशी संपर्क साधावा व प्रशासनास सहकार्य करावे. तसेच किरकोळ ग्राहकांना फळ मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही व फळ मार्केटमधील सर्व घटकांनी मास्क, सॅनीटायझर, सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारSangliसांगली