आष्टा : आष्टा शहरात कोरोनाचे ९ रुग्ण सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. राम मंदिरनजीक एका घरातील ४ व्यक्ती गुरुवारी पॉझिटिव्ह होत्या. तर शिराळकर कॉलनी येथील दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. शुक्रवारी राम मंदिर येथील दोघे जण व डांगे कॉलेज परिसरातील एक विद्यार्थी पॉझिटिव्ह आला आहे. दोन दिवसांत एकाच घरातील सहा लोकांसह तीन विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले.
यातील दोन रुग्णांना त्रास जाणवू लागल्याने मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी तातडीने संपर्क साधून मिरज शासकीय कोविड सेंटर येथे पाठवले, तर उर्वरित रुग्णांना आष्टा ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.
डॉ. कैलास चव्हाण, आरोग्य अधिकारी आर.एन. कांबळे, आष्टा ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी, मलेरिया विभागाचे बी.बी. कांबळे, आरोग्य कर्मचारी एस.डी. साबणावार, सामाजिक कार्यकर्ते शकील मुजावर, अंकुश मदने यांच्यासह परिचारिका कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.