शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मिरजेत नवीन भाजीमंडईचे काम रखडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:32 IST

मिरजेतील १३ कोटी खर्चाची भाजी मंडई उभारणीसाठी ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र खंदकातील भाजी मंडईकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, काम थांबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने भाजी मंडईचे काम आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमिरजेत नवीन भाजीमंडईचे काम रखडणारआयुक्तांनी दिल्या काम थांबविण्याच्या सूचना

मिरज : मिरजेतील १३ कोटी खर्चाची भाजी मंडई उभारणीसाठी ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र खंदकातील भाजी मंडईकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, काम थांबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने भाजी मंडईचे काम आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी रेवणी मार्केट परिसराजवळ असलेल्या किल्ल्याच्या खंदकाच्या जागेत भाजी मंडईच्या कामाचे घाईगडबडीत उद्घाटन करण्यात आले. शासनाने भाजी मंडईसाठी १३ कोटी रुपये निधी महापालिकेस दिला आहे. भाजी मंडईचा आराखडा तयार करून व तांत्रिक व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून निविदा मागविण्यात आल्या. निविदा निश्चित करून ठेकेदारास काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.

ठेकेदाराने खंदकातील पाण्याचा मोटारी लावून उपसा सुरु केला. मात्र काम सुरू झाल्यानंतर प्रस्तावित आराखड्यानुसार भाजी मंडईकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने बांधकाम परवानगी देणे अशक्य असल्याचा पवित्रा नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. खंदकातील भाजी मंडईकडे जाण्यासाठी आवश्यक रूंदीचा रस्ता दोन्ही बाजंूनी उपलब्ध झाल्यानंतर बांधकाम परवानगी मिळणार आहे.

बांधकाम परवानगीशिवाय भाजी मंडई उभारणी अशक्य असल्याने भाजी मंडईसाठी खंदकाच्या काठावरील रस्त्यासाठी जागेचे संपादन करावे लागणार आहे. महापालिकेने किल्ल्याभोवती असलेल्या खंदाकाची सुमारे पाच एकर जागा भाजी मंडईसाठी आरक्षित केली आहे. मात्र खंदकाच्या दोन्ही बाजूस असलेल्या खासगी मिळकतीतून रस्त्यासाठी जागा मिळविणे आवश्यक आहे.रस्त्यासाठी खंदकातील भाजी मंडईचे काम थांबल्यास मार्केट परिसरात पर्यायी जागा शोधण्याची मोहीम पुन्हा सुरु केल्यास भाजी बाजार पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत. किल्ल्यातील खंदकात सांडपाणी सोडण्यात येत असल्याने येथे भाजी मंडई बांधली तरी, वारंवार खंदकातील पाणी उपसा करावा लागणार आहे. अन्यथा पाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

भाजी मंडईसाठी दोन्ही बाजूस रुंद रस्ते करून देण्यासाठी अतिक्रमणे काढून काही मालमत्ता धारकांना जागेचा मोबदला देण्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. भाजी मंडईसाठी रस्त्यांची व्यवस्था न करताच काम सुरू केल्याने १३ कोटींची सुसज्ज अशी भाजी मंडईची उभारणी अडचणीत आली आहे.

भाजी मंडईसाठी जागेचा शोध गेली अनेक वर्षे सुरु आहे. कमान वेस परिसरात ३ एकर जागेचा पर्याय मनपा प्रशासनापुढे आहे. येथे भाजी मंडईसाठी विक्रेते तयार नसल्याने खंदकातील भाजी मंडईचे काम सुरु न झाल्यास निधी परत जाण्याची भीती आहे.मिरजेतील भाजी मंडईबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भाजी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत काम थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकाम परवाना नसताना काम सुरू करण्याचे आदेश काढून महापालिका प्रशासनाच्या घाईमुळे भाजी मंडई उभारणी अडचणीत आल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Marketबाजारmiraj-acमिरजSangliसांगली