शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन सावकारीचा नवा फंडा, गरजवंतांना लाखो रुपयांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाने आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या लाखो कुटुंबांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना भीकेकंगाल करण्यासाठी लुटारूंनी मोबाईल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाने आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या लाखो कुटुंबांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना भीकेकंगाल करण्यासाठी लुटारूंनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन सावकारीचा नवा फंडा शोधला आहे. देशात, राज्यात तसेच आता जिल्हास्तरावरही या टोळीने हात-पाय पसरले असून लाखो रुपयांचा गंडा कर्जदारांना घातला जात आहे.

कर्जाची गरज असलेल्या सामान्य लोकांना राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांचे निकष पूर्ण करणे शक्य होत नाही. बऱ्याचदा त्यांना बँकांमार्फत झिडकारले जाते. त्यामुळे असे गरजवंत सावकाराच्या जाळ्यात ओढले जातात. सावकारीचा आधुनिक प्रकार आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून समोर आला आहे. ''''तुम्ही आर्थिक संकटात आहात, तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय जलद कर्ज हवे आहे का'''' अशा वाक्यांचा भडीमार करून हे रॅकेट गरजू लोकांना जाळ्यात ओढत आहे. सुरुवातीला कमी व्याजाचे आमिष दाखवून नंतर खासगी सावकारीप्रमाणे वसुली करण्यात येते. त्यासाठी धमकीचे फोनही केले जातात.

तामिळनाडूत असेच एक मोबाईल ॲपचे रॅकेट पकडण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यातही अशाप्रकारच्या जाहिराती, मेसेजेस पाठवून अनेकांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये याबाबतच्या सतर्कतेचा रिझर्व्ह बँकेचा इशारा फलकांवर झळकविला आहे.

चाैकट

अशी होते फसवणूक...

पाच हजार रुपयांपासूनच्या छोट्या कर्जाची सोय

व्याज आकारणी केल्यानंतरही प्रत्येक हप्त्याला स्वतंत्र व्याज आकारणी

व्याज देण्यास नकार दिल्यास धमकीचे फोन केले जातात

कॉल सेंटरच्या माध्यमातून हे कॉल होत आहेत.

एकाच सेंटरमधून सात ते आठ वेगवेगळ्या कंपन्या दाखविल्या जातात

गरीब लोक धमकीला घाबरून तसेच कायदेशीर कारवाईच्या कटकटींपासून दूर राहण्यासाठी या टोळीच्या मागणीप्रमाणे पैसे देतात

पाच हजाराच्या कर्जाला ८ ते ९ हजार रुपयांची वसुली केली जाते.

बँक खात्यासह इतर केवायसी कागदपत्रे घेऊन त्याद्वारे ऑनलाईन फसवणुकीचेही प्रकार होत आहेत.

चौकट

रिझर्व्ह बँकेचा इशारा

रिझर्व्ह बँकेचे मुख्य व्यवस्थापक योगेश दायाल यांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनधिकृत डिजिटल मंच व मोबाईल ॲपच्या कर्जाला सामान्य नागरिक व छाेटे व्यावसायिक बळी पडत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक व नॉन बँकिंग फायनान्सियल कंपन्यांच्या अधिकृत प्लॅटफॉर्मची माहिती घेऊन अनधिकृत रॅकेटपासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे.