शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक प्रवेशासाठी निगेटीव्ह प्रमाणपण सोबत आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 14:24 IST

CoronaVirus Sangli Karnatka-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात प्रवेश करतेवेळी संबंधितांकडे 72 तासाच्या आतील निगेटीव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिस अधिक्षक बेळगावी कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे72 तासाच्या आतील आरटीपीसीआर प्रमाणपत्र अनिवार्यनिगेटीव्ह प्रमाणपत्र 7 दिवसांच्या कालावधीसाठी वैध

सांगली  : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात प्रवेश करतेवेळी संबंधितांकडे 72 तासाच्या आतील निगेटीव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिस अधिक्षक बेळगावी कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनास कळविण्यात आले आहे.कर्नाटक राज्यात विमान/बसेस/ट्रेन/वैयक्तिक वाहन आदि व्दारे प्रवेश करणाऱ्यांना 72 तासाच्या आतील निगेटीव्ह आरटीपीसीआर  प्रमाणपत्र अनिवार्य आहे. निगेटीव्ह आरटीपीसीआर रिपोर्टची तपासणी बोर्डिंगच्यावेळी विमान कर्मचाऱ्याव्दारे करण्यात येईल. बस ने प्रवास करणाऱ्यांना निगेटीव्ह आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवल्यानंतरच तिकीट दिले जाईल. ज्यांनी ऑनलाईन तिकिट बुक केले आहे त्यांचा रिपोर्ट बोर्डिंगवेळी बसचे कंडक्टर तपासतील.

ट्रेनमध्ये टीटीई रिपोर्ट तपासतील. वैयक्तिक वाहनाव्दारे येणाऱ्यांची टोल गेट / एक्झिट पॉईंट वर टेस्टिंग रिपोर्टची रँडम तपासणी केली जाईल. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान अल्पकालीन प्रवास करणाऱ्यानांही 72 तासाच्या आतील निगेटीव्ह आरटीपीसीआर  प्रमाणपण आवश्यक आहे. निगेटीव्ह प्रमाणपत्र 7 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असेल.

याशिवाय 14 दिवस ते स्वत: त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवतील. श्वसना संबंधी लक्षणे आढळल्यास जसे ताप, खोकला, थंडी, घसा, श्वास घेण्यास त्रास आदि लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन कोविड-19 ची तपासणी करून घ्यावी, असे पोलिस अधिक्षक बेळगावी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtollplazaटोलनाकाKarnatakकर्नाटकSangliसांगली