शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

वृद्ध मातापित्याचे संगोपन सक्तीचे करणाऱ्या नरवाड ग्रामपंचायतीची निलम गोऱ्हे यांनी घेतली दखल

By संतोष भिसे | Updated: February 4, 2024 16:18 IST

सरपंच मारुती जमादार यांनी सांगितले की, या ठरावामुळे आईवडिलांना न सांभाळणाऱ्यांना चांगलाच कानमंत्र मिळाला आहे.

नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथील ग्रामसभेत ''माता-पित्यांचा सांभाळ न केल्यास मालमत्ता विसरा'' असा ठराव झाला होता. त्याची दखल विधान परिषदेच्या उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांनी घेतली असून ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले आहे. गावाच्या भेटीसाठी त्या लवकरच येणार आहेत. या ठरावाबाबतचे वृत्त लोकमतमधून प्रसिद्ध केले होते. ते गोऱ्हे यांच्या वाचनात आले.

सरपंच मारुती जमादार यांनी सांगितले की, या ठरावामुळे आईवडिलांना न सांभाळणाऱ्यांना चांगलाच कानमंत्र मिळाला आहे. चांगल्या व विधायक कामांची पाठराखण लोकमत करीत असल्याचे यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.  दरम्यान, लोकमतमध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सरपंच मारुती जमादार यांना राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामसभेत झालेल्या ठरावाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सरपंचांनी विविध विभागांना दिल्या आहेत. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना यापुढे रेशनचा लाभ मिळणार नाही. महसूल विभागात वारस नोंद, आरोग्य विभागाच्या सवलती यांना ग्रामपंचायतीने ब्रेक लावला आहे. हा ठराव झाल्यापासून गावाच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. नात्यांचे तुटलेले धागे पुन्हा घट्ट होऊ लागले आहेत. मुलाबाळांपासून दुरावलेल्या वृद्ध मातापित्यांच्या चेहऱ्यावरील हरविलेले हसू पुन्हा खुलू लागले आहे.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेSangliसांगली