शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

राष्ट्रवादीच्या खजिनदारास धमकी

By admin | Updated: May 25, 2015 00:31 IST

सांगलीतील प्रकार : पाच लाखांची मागणी; तिघांविरुद्ध गुन्हा

सांगली : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार मुश्ताकअली मुनवरअली रंगरेज (वय ४८, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, वसंतदादा साखर कारखाना परिसर, सांगली) यांना घरात जाऊन पाच लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार शनिवारी रात्री साडेदहा वाजता घडला. खंडणीची रक्कम न दिल्यास संपूर्ण कुटुंबास ठार मारेन, अशी धमकीही देण्यात आली. याप्रकरणी गुंड निसार नगारजी (वय ४५), आयुब बारगीर (३६, दोघे रा. खणभाग) व आयुब पटेल (३८, रेपे प्लॉट, पंचशीलनगर, सांगली) या तिघांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.संशयित निसार नगारजी, आयुब बारगीर व आयुब पटेल यांची रंगरेज यांच्याशी ओळख आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजता ते रंगरेज यांच्या घरी गेले. ओळख असल्याने रंगरेज यांनी त्यांना घरात घेतले. त्यानंतर संशयितांनी ‘कराडसे सलीम बात कर रहा है, बोलो’, असे म्हणून रंगेरज यांच्याकडे मोबाईल दिला. सलीमनामक व्यक्तीने ‘कराडसे सलीम बोल रहा हू, पाच लाख रुपये मेरे आदमीके पास दो’, असे सांगितले. रंगरेज यांनी ‘कसले पैसे, कशासाठी द्यायचे’, अशी विचारणा करताच सलीमने मोबाईल बंद केला. त्यानंतर रंगरेज यांनी संशयितांकडे ‘हा काय प्रकार आहे, हा सलीम कोण आहे’, अशी विचारणा केली. त्यावर संशयितांनी ‘आम्हाला पैशाची गरज आहे, तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला व तुमच्या कुटुंबास जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे रंगरेज घाबरून गेले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून त्यांचे भाऊ जमीर रंगरेज आले. त्यानंतर संशयितांनी पलायन केले. रंगरेज यांनी रात्री उशिरा संजयनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी निसार नगारजीसह तिघांविरुद्ध खंडणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)