चोरोची आणि नांगोळे या गावांकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. नांगोळे येथे कवठेमहांकाळ बाजार समिती सभापती दादासाहेब कोळेकर यांनी नऊपैकी आठ जागा जिंकत निर्विवाद सत्ता राखली. चोरोचीमध्ये नऊ विरुद्ध शून्य असा घोरपडे गटाने राजाराम पाटील, पांडुरंग यमगर यांच्या नेतृत्वाखाली आबा-काका गटाचा पराभव केला. या ठिकाणी राष्ट्रवादीला खातेही खोलता आले नाही.
नांगोळे येथे दादासाहेब कोळेकर (भाजप) आठ, तर राष्ट्रवादी एक, चोरोची येथे राजाराम पाटील नऊ (घोरपडे गट), जांभूळवाडीत राष्ट्रवादी पाच, भाजप दोन, निमज येथे खासदार संजयकाका पाटील गट पाच, इतर दोन, थबडेवाडीत सहा (घोरपडे गट), राष्ट्रवादी तीन, म्हैसाळ एम येथे राष्ट्रवादी पाच, घोरपडे गट दोन, इरळी येथे राष्ट्रवादी पाच, घोरपडे गट चार, तिसंगीमध्ये राष्ट्रवादी सहा, अपक्ष तीन, बनेवाडीत राष्ट्रवादी व घोरपडे गट संयुक्त आघाडी नऊ, रायवाडीत राष्ट्रवादी पाच, अपक्ष दोन, मोघमवाडी बिनविरोध (राष्ट्रवादी).
चौकट
घोरपडे गटाला धक्का
म्हैसाळ (एम) हे घोरपडे गटाच्या जिल्हा शिक्षण सभापती आशाताई पाटील यांचे गाव. येथे राष्ट्रवादीने सातपैकी पाच जागा जिंकत सत्ता मिळवली, तर घोरपडे गटाला फक्त दोन जागा मिळाल्या.
चौकट
नांगोळेत सत्ता कायम
नांगोळे गावात कवठेमहांकाळ बाजार समिती सभापती दादासाहेब कोळेकर यांनी तब्बल पंधरा वर्षे सत्ता कायम राखली आहे. आठ विरुद्ध एक अशी एकतर्फी सत्ता राखली.
फोटो-१८कवठेमहांकाळ१
फोट ओळ : नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील विजयी उमेदवार छायाताई दादासाहेब कोळेकर यांचा ग्रामस्थ महिलांनी सत्कार केला.