शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

राष्ट्रवादीचा सांगलीत मोर्चा

By admin | Updated: January 9, 2017 22:54 IST

नोटाबंदीला विरोध : केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

सांगली : नोटाबंदीच्या विरोधात सोमवारी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयापासून झाली. राम मंदिर, कॉँग्रेस भवन, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला. आंदोलनात आ. सुमनताई पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पाटील, राष्ट्रवादीचे नेते इलियास नायकवडी, शंकरदादा पाटील, माजी आ. विलासराव शिंदे, मनोज शिंदे, महापालिका स्थायी समिती सभापती संगीता हारगे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी, बाबासाहेब मुळीक, पी. आर. पाटील, ताजुद्दिन तांबोळी, वैभव शिंदे, राहुल पवार, बाळासाहेब होनमोरे, बी. के. पाटील, विराज नाईक, सागर घोडके, वसुधा कुंभार, अनिता पांगम, छाया जाधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)इशारा नेत्यांचा : सदाभाऊंना गावबंदीचाशेतकऱ्यांच्या जिवावर राजकारण करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आता त्यांची कोणतीही फिकीर नाही. शेतकरी संकटात असताना, ते ही परिस्थिती मान्य करीत नाहीत. खुर्ची बदलली की चष्मा बदलतो, याचे हे उदाहरण आहे. त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही, तर जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्यांना प्रवेशबंदी करावी लागेल, असा इशारा दिलीपतात्या पाटील यांनी दिला. जयंत पाटील यांनीही नामोल्लेख न करता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली.कोण, काय म्हणालेजयंत पाटील : रघुराम राजन यांनी देशातील ठराविक धनिकांच्याकडील थकीत कर्जे तातडीने वसूल करण्याबाबत चार ते पाच पत्रे दिली होती. त्यांच्या या सूचनेने धनिकांची लॉबी जागी झाली आणि त्यांनी मोदींना हाताशी धरून राजन यांनाच पदावरून हटविले. याच धनिकांकडे अडकलेली कोट्यवधी रुपयांची थकबाकी माफ करण्याच्या उद्देशानेच मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. काळा पैसा जमा होईल आणि त्यातून या धनिकांचा फायदा करून देता येईल, असे गणित त्यांनी आखले होते. नोटाबंदीचा निर्णयच फसल्याने त्यांचे हे मनसुबे यशस्वी झाले नाहीत, मात्र गरीब जनता यात भरडली जात आहे. देशातील प्रत्येक घटकाला वेठीस धरण्याचा उद्योग आता सुरू झाला आहे. जिल्हा बॅँकेनंतर आता अंमलबजावणी संचालनालयामार्फत सुवर्ण व्यावसायिकांना वेठीस धरले जात आहे. एकही घटक या निर्णयाच्या धक्क्यातून सावरलेला नाही. आर्थिक समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे जोपर्यंत सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना आणि कष्टकरी जनतेला या निर्णयाच्या कचाट्यातून सोडविले जात नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी आंदोलन करेल, असे ते म्हणाले. अण्णा डांगे : नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा होणार की तोटा, हे आता काळच ठरवेल. कोणतेही नियोजन न करता हा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने सामान्य जनता आता अडचणीत सापडली आहे. जिल्हा बॅँकांप्रमाणे पतसंस्थाही अडचणीत आल्या आहेत. शासनाने ही परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा लोकांना हे सरकारच बदलावे लागेल. दिलीपतात्या पाटील : (जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष ) जी व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलते, त्याच्याविरोधात षड्यंत्र रचण्याचे काम केले जात आहे. जिल्हा बॅँकेला अडचणीत आणण्याचे कामही याच षड्यंत्राचा भाग आहे. देशातल्या तपासणी करणाऱ्या सर्व यंत्रणा आता दमल्या. आता मोदी आणि जेटली जिल्हा बॅँकेच्या तपासणीसाठी येणार आहेत.