शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

तरुण, स्वच्छ चेहऱ्यास देणार राष्ट्रवादीची उमेदवारी

By admin | Updated: October 26, 2016 00:11 IST

सुमन पाटील : तासगावात घेतल्या शंभरहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती; पक्षनिरीक्षक उपस्थित

तासगाव : नगरपालिका निवडणुकीसाठी यंदा २१ वॉर्डांतून व १0 प्रभागांमधून लढत होत आहे. यासाठी सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सोमवारी आमदार सुमनताई पाटील यांनी शंभरहून अधिक जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी प्रत्येक उमेदवाराचा अभ्यास, त्याची विकासकामे, लोकसंपर्क याची माहिती घेतली. तरुण व स्वच्छ चेहऱ्यासच राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पक्षनिरीक्षक दिलीप पाटील, स्मिता पाटील, प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, नगरसेवक अजय पाटील, अमोल शिंदे, अभिजित माळी उपस्थित होते.तासगाव नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. अनेकांनी थेट नगराध्यक्ष ते नगरसेवक पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधत, आपापल्या पक्षांकडे उमेदवारी मागितली आहे. भाजपकडून अनेक जणांनी उमेदवारी मिळण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत. शनिवारी खासदार पाटील यांनी चिंचणी येथे निवासस्थानी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, सोमवारी राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील यांनी गजानन कोल्ड स्टोअरेज येथे राष्ट्रवादी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी शंभरहून अधिक इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह येऊन मुलाखती दिल्या. प्रभाग क्रमांक दोनमध्ये एका इच्छुकाने ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून २00 ते ३00 समर्थकांसह येऊन उमेदवारी मागितली.यावेळी आमदार पाटील यांनी, उमेदवारांची आर्थिक पत, वॉर्डातली माहिती, लोकसंख्या, प्रभागातील नेटवर्क, विकासकामे, विरोधक यांची विस्तृत माहिती घेतली. मुलाखतीसाठी अनेक इच्छुक दिवसभर थांबून होते. १०० हून अधिक जणांंनी मुलाखती दिल्या. तरुणांना तसेच स्वच्छ चेहऱ्यासच उमेदवारी दिली जाईल, असे आमदार सुमनताई पाटील यांनी यावेळी सांगितले.सुरेश पाटील, हणमंत देसाई, अमोल शिंदे, राजू थोरात, कमलेश तांबवेकर, यासीन मुल्ला, अभिजित माळी, राजू सावंत, अनिल जाधव, पवार गुरूजी, बापू धनवडे यावेळी उपस्थित होते. मुलाखतीसाठी स्वत: पक्षनिरीक्षक दिलीपतात्या पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)‘थेट’साठी १३ जण इच्छुकसोमवारी आमदार सुमनताई पाटील यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी इच्छुकांच्या मुलाखतीस मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी थेट नगराध्यक्ष पदासाठी तब्बल तेरा जणांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आपण इच्छुक असल्याचे सांगत उमेदवारीची मागणी केली. चर्चेअंती यासाठी उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत.