शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात राष्ट्रवादी मौनात की कोमात?

By admin | Updated: October 15, 2015 00:35 IST

नगरसेवकांची सोडचिठ्ठी : नेत्यांची हतबलता

दत्ता पाटील--तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करुन पक्षाला धक्का दिला आहे. एकेकाळी पालिकेत बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीचे, आता अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे. शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असतानादेखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौन सोडलेले नाही. भाजपचे कमळ हातात धरणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईचा बडगाही उगारलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी मौनात आहे की कोमात, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील आबा आणि खा. संजयकाका पाटील यांच्या गटाने एकत्रितपणे तासगाव नगरपालिकेची गतवेळची निवडणूक लढवली होती. त्यात आबा गटाचे वर्चस्व होते. दोन्ही नेते एकत्र असतानादेखील कार्यकर्त्यांत कुरघोडीचे राजकारण सुरूच होते. किंंबहुना खासदार संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही गटांतील कुरघोड्या वाढल्या. दरम्यान, आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची अवस्था, वर्चस्व असूनदेखील आत्मविश्वास गमावल्यासारखी झाली होती. नगरसेवकांतील वैयक्तिक हेवेदावे आणि अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत खा. संजयकाका पाटील यांनी नाराज नगरसेवकांना गळ लावला. तीन नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देत, त्यापैकी एकाला नगराध्यक्षपदही बहाल केले. पालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर राजकीय स्थित्यंतर थांबेल, असे वाटत असतानाच, राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. आयेशा नदाफ यांचे नगरसेवकपद रद्द होऊ नये, यासाठी खासदार संजयकाकांनी खेळी केली. त्यानंतर डॉ. नदाफ यांनीही खासदारांचे नेतृत्व मान्य केले. नगराध्यक्ष बदलासाठी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी राष्ट्रवादीत राहूनच भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. त्यापैकी नगरसेवक जाफर मुजावर यांनाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपवासी केले. आबांच्या पश्चात पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के बसत असताना, पक्षातील नेते मात्र मौन धारण करुन आहेत. पक्षाला अस्तित्व शोधण्याची वेळ आली असताना, नेत्यांचे मौन का, असा सवाल सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत. कवठेमहांकाळ पंचायत समितीत पक्ष सोडणाऱ्या सदस्यांना सदस्यत्व रद्दचा इशारा पक्षाकडून देण्यात आला. मात्र तासगाव पालिकेत भाजपचे कमळ हातात धरणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करण्यासाठी नेते हतबल झाले आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीसोबतचनगरसेवकांनी वैयक्तिक स्वार्थापोटीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. स्वार्थीनी पक्ष सोडल्यामुळे यापुढे निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. आ. सुमनताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व दाखवून देणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कमलेश तांबवेकर आणि स्वप्नील जाधव यांनी सांगितले.लक्ष कोण घालणार? काही महिन्यांपूर्वी तासगाव-कवठेमहांकाळमध्ये दुसऱ्या नेतृत्वाला लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचे वक्तव्य पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. आता कवठेमहांकाळ पंचायत समिती आणि तासगाव नगरपालिका दोन्हीकडे भाजपने धक्का दिला आहे. आता तरी राष्ट्रवादीचे नेते लक्ष घालणार का, याची चर्चा आहे.