शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत सॅनिटरी पॅडसवरील जीएसटीविरोधात आंदोलन, महिला राष्ट्रवादीचे निवेदन : पॅडसवर २२ टक्के कर हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 17:51 IST

एकीकडे कुंकू, बांगड्या यावरील जीएसटी रद्द करून महिलांविषयीच्या धोरणाचा गाजावाजा होत असताना सॅनिटरी पॅडसवर मात्र २२ टक्के जीएसटी का लावण्यात आला आहे, असा सवाल गुरुवारी राष्ट्रवादी महिला आघाडीने व्यक्त केला. याप्रश्नी त्यांनी सांगलीत निदर्शने करीत पॅडस्वरील कर हटविण्याची मागणी केली.

ठळक मुद्देसांगलीत सॅनिटरी पॅडसवरील जीएसटीविरोधात आंदोलनमहिला राष्ट्रवादीचे निवेदन पॅडसवर २२ टक्के कर हटवा

सांगली : एकीकडे कुंकू, बांगड्या यावरील जीएसटी रद्द करून महिलांविषयीच्या धोरणाचा गाजावाजा होत असताना सॅनिटरी पॅडसवर मात्र २२ टक्के जीएसटी का लावण्यात आला आहे, असा सवाल गुरुवारी राष्ट्रवादी महिला आघाडीने व्यक्त केला. याप्रश्नी त्यांनी सांगलीत निदर्शने करीत पॅडस्वरील कर हटविण्याची मागणी केली.सांगलीच्या राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर राष्ट्रवादी महिला आघाडीने जोरदार निदर्शने केली. याविषयीचे निवेदन त्यांनी स्थानिक जीएसटी अधिकाऱ्यांना दिले. दिल्लीतील जीएसटी कौन्सिललाही त्यांनी एक पत्र गुरुवारी पाठविले.

यामध्ये त्यांनी म्हटले की, स्त्रियांचा सन्मान करण्याची भारतीय परंपरा आहे. सॅनिटरी पॅडस ही अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. गेल्या काही वर्षात याचा वापर वाढला असला तरी आजही अनेक स्त्रिया पॅडस् वापरत नाहीत. सॅनिटरी पॅडस्च्या प्रचाराचा प्रयत्न केला जात असताना गेल्या कित्येक वर्षात याचे दर कमी झाले नाहीत.

पॅडस्वर सध्या २२ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामागे जीएसटी परिषदेची नेमकी भूमिका काय आहे? महिलांच्या हिताचे आणि सन्मानाचे धोरण राबविले जात असल्याचा गाजावाजा होत असताना अशाप्रकारे महिलांच्या गरजेच्या वस्तुवर मोठ्या प्रमाणावर कर लादल्याने हा विरोधाभास वाटतो.

स्त्रियांच्या वेदनेचा वापर तिजोऱ्या भरण्यासाठी करण्यात येऊ नये. उत्पन्न वाढीचे अन्य मार्ग सरकारने शोधावेत. त्यामुळे शासनाने तातडीने सॅनिटरी पॅडस्वरील जीएसटी शून्य टक्के करावा, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.महिला आघाडीच्या अध्यक्षा विनया पाठक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्षा राधिका हारगे, शहराध्यक्षा अनिता पांगम, मिरज शहराध्यक्षा वंदना चंदनशिवे, सुनीता लालवानी, मोनिका तांदळे, रंचल मगदुम, सुरेखा मासाळ, संगीता मासाळ, वंदना कुलकर्णी, काजल आहुजा आदी सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Sangliसांगलीwomen and child developmentमहिला आणि बालविकास