शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्य नाट्यस्पर्धेत सांगली, सातारा केंद्रात वैयक्तिक चार पारितोषिकांसह 'शमा' प्रथम

By संतोष भिसे | Updated: December 15, 2022 18:08 IST

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गुरुवारी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. दोन्ही नाटके मुंबईतील अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत.

सांगली : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत सांगली-सातारा केंद्रातून सांगलीतील नटराज फाऊंडेशनच्या 'शमा' नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले. नायगाव (जि. सातारा) येथील सूर्यरत्न युथ फाऊंडेशनच्या 'आपुलीचा वाद आपणासी' नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गुरुवारी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. दोन्ही नाटके मुंबईतील अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहेत.१५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत सांगलीत भावे नाटयमंदिर व साताऱ्यात शाहू कलामंदिरात स्पर्धा झाली होती. एकूण २३ नाट्यप्रयोग सादर झाले होते. निकाल असा : तृतीय - 'वटवट सावित्री', पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट, सातारा.दिग्दर्शन प्रथम विनोद आवळे (शमा), द्वितीय सिध्देश नेवसे (आपुलाची वाद आपणासी), प्रकाश योजना प्रथम यश नवले (अंत्यकथा), द्वितीय शाम चव्हाण (एकच प्याला), नेपथ्य प्रथम सिध्देश नेवसे (आपुलाची वाद आपणासी), द्वितीय प्रताप सोनाळे (अंत्यकथा), रंगभूषा प्रथम प्रसाद गद्रे (अंत्यकथा), द्वितीय किशोरी साळुंखे (शमा).परीक्षक म्हणून सुहास वाळुंजकर, विश्वास देशपांडे आणि चंद्रशेखर भागवत यांनी काम पाहिले.अभिनयासाठी रौप्यपदकेउत्कृष्ट अभिनय रौप्यपदक अथर्व तारकुंडे (आपुलाची वाद आपणासी) व वैष्णवी जाधव (अंत्यकथा), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे शुभांगी चव्हाण (शमा), प्राजक्ता दयाळ (वटवट सावित्री), रत्नेषा पोतदार (शमा), वैष्णवी जाधव (गजर), भाग्यश्री कुलकर्णी (एकच प्याला), विजय काटकर (बदला गं माझा दादला), उदय गोडबोले (बाकी शून्य), आदित्य जोशी (खिडक्या), परेश पेठे (एकच प्याला) राजेश मोरे (वटवट सावित्री).

टॅग्स :Sangliसांगली