शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

सांगली, मिरजेतील आठ नगरसेवक राणेंच्या भेटीला, निवडणुकीची तयारी : महापालिका लढवू- नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 16:24 IST

सांगली महापालिकेच्या आठ नगरसेवकांनी शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनीही नगरसेवक व विविध पक्षांचे लोक भेटल्याचे सांगत सांगली महापालिका निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. सांगली, मिरजेतील आठ नगरसेवक राणेंच्या गळाला असे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले.

ठळक मुद्देनगरसेवकांच्या भेटीची दिवसभर चर्चा, नियोजनातही अन्य पक्षीयलोकमतचे वृत्त तंतोतंत खरे, आवटी यांच्याकडून दुजोरा नाहीगणपती मंदिर, वसंतदादा स्मारकाचे दर्शन

सांगली : महापालिकेच्या आठ नगरसेवकांनी शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनीही नगरसेवक व विविध पक्षांचे लोक भेटल्याचे सांगत सांगली महापालिका निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. सांगली, मिरजेतील आठ नगरसेवक राणेंच्या गळाला असे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रसिद्ध केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले.

 राणे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून शहरात विविध पक्षांमधील हालचाली गतिमान झाल्या आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते राणे यांच्या दौऱ्याच्या तयारीत व्यस्त होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच सांगली दौरा होता. त्यामुळे त्यांची भेट घेण्यास येणाऱ्या लोकांबाबत उत्सुकता होती. काही नगरसेवकांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.

ही बातमी सर्वत्र पसरल्यामुळे या नगरसेवकांनी वेळेत बदल करून सकाळी आठ वाजता विश्रामबाग परिसरातील हॉटेलमध्ये राणे यांची भेट घेतली. राणे यांनी पत्रकारांनी बोलताना सांगितले की, सर्वच ठिकाणी मला अन्य पक्षातील अनेक लोक भेटत आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाचीही चर्चा होत आहे.

सांगलीतही असाच अनुभव आला. येथील काही नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी मला भेटून गेले. महापालिका निवडणुकीसंदर्भात आम्ही सकारात्मक आहोत. प्रसंगी ही निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे. पक्षात सरसकट कोणालाही प्रवेश देण्याची आमची भूमिका नाही.

महापालिका निवडणुकीपूर्वी काही महिने मी पुन्हा सांगलीला येणार आहे. त्यावेळी केवळ महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेईन. जे लोक आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत, त्यांची चाचपणी केली जाईल. योग्यता पाहूनच आम्ही प्रवेश देऊन महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढवायची की कोणाशी आघाडी करून लढवायची, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचवेळी पक्षात येऊ पाहणाऱ्या लोकांची स्थिती व एकूणच वातावरण पाहून आम्ही निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.नगरसेवकांच्या भेटीची चर्चामहापालिकेतील सत्ताधारी कॉंग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी, निरंजन आवटी, सुरेखा कांबळे, आयुब पठाण, बाळासाहेब गोंधळी, राष्ट्रवादीचे अल्लाउद्दीन काझी, नितीन शिंदे, हेमंत खंडागळे (नगरसेविका पती) यांनी नारायण राणे यांच्याशी घेतलेली भेट दिवसभर चर्चेचा विषय होती.

भाजपचे युवराज बावडेकर यांनीही राणे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील आणि शेखर इनामदार यांनीही राणे यांचे स्वागत करीत त्यांच्याशी संवाद साधला, मात्र घटक पक्षाच्या नेत्याचे स्वागत करणे हा शिष्टाचार असल्याचे इनामदार यांनी स्पष्ट केले.आवटी यांच्याकडून दुजोरा नाहीआवटी पिता-पुत्रांनी राणे यांची भेट घेतल्याची चर्चा दिवसभर रंगली होती. यासंदर्भात आवटी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशी कोणतीही चर्चा झाल्याचा इन्कार केला.वसंतदादा स्मारकाचे दर्शनराणे यांनी सकाळी नऊ वाजता गणपती मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. त्यावेळी नगरसेविका आशा शिंदे यांचे पती नितीन शिंदे, माजी नगरसेवक धनंजय सूर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राणे यांनी वसंतदादास्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी वसंतदादांचे नातू विशाल पाटील उपस्थित होते.

नियोजनातही अन्य पक्षीयराणे यांच्या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन सम्राट महाडिक यांनी केले होते. त्यांच्याबरोबर नजीर वलांडकर, लालू मेस्त्री, आसिफ बावा, वाहिद बेग हेसुद्धा नियोजनात होते. अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा वावर याठिकाणी दिसून आला. संपूर्ण दौऱ्यात राणे यांच्यासोबत सम्राट महाडिक होते. त्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सांगलीत रंगली होती.लोकमतचे वृत्त तंतोतंत खरेसांगली, मिरजेतील आठ नगरसेवक राणेंच्या गळाला असे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. राणे यांच्या दौऱ्यावेळी हे नगरसेवक त्यांना भेटल्यामुळे वृत्त तंतोतंत खरे ठरले. काही नगरसेवकांनी भेटीच्या चर्चेस इन्कार केला असला तरी संयोजनातील प्रमुख कार्यकर्त्यांनी या भेटीच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sangliसांगली