शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंग्या तलवारींसह तरुणांचा धुमाकूळ

By admin | Updated: August 7, 2016 23:09 IST

सांगलीत घटना : दोन वाहनांची तोडफोड; खणभागामध्ये तणाव

सांगली : येथील खणभागात भरदिवसा तरुणांच्या टोळक्यांनी नंग्या तलवारी घेऊन धुमाकूळ घातला. एकाच्या हातात रिव्हॉल्व्हरही होते. टोळक्याने दोन वाहनांची मोडतोड केली. दगडफेकही झाल्याने तणाव निर्माण झाला होता. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी ही घटना घडूनही शहर पोलिसांत याची रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती. टिंबर एरिया परिसरातील सात ते आठजणांचे टोळके दुचाकीवरून खणभागात आले होते. त्यांच्या हातात तलवारी होत्या. एकाच्या हातात रिव्हॉल्व्हर होते. नंग्या तलवारी नाचवित त्यांनी आरडाओरड केली. गल्ली-बोळात जाऊन धुडगूस घातला. दोन तरुणांच्या शोधासाठी ते आले होते. यातील एक तरुण त्यांना सापडला. त्यांनी त्याला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तेवढ्यात आणखी एका तरुणास पकडून त्यांनी मारहाण केली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला. खणभागातील लोक जमू लागल्यानंतर टोळक्याने अधिकच दंगा सुरू केला. रस्त्याकडेला लावलेल्या दोन वाहनांची दगडफेक करुन मोडतोड केली. एक वाहन तर रस्त्यावर पाडून त्यावर दगड घालण्यात आला. ज्या तरुणांना ते मारहाण करीत होते, ते त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी आरडाओरड करीत होते. तेवढ्यात त्यांचे नातेवाईकही सर्व तयारीने आले. दोन्ही गट आमने-सामने भिडले. पण खणभागातील जमाव वाढू लागल्याने तरुणांच्या टोळक्याने तेथून पलायन केले. हल्ल्यात जखमीपैकी एकजण उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता. त्याने सुरुवातीला दुचाकीवरून पडून जखमी झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पत्रा लागून जखमी झाल्याचे सांगितले. जखमी तरुण खणभागातील आहे. त्याच्या समर्थकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. शहर पोलिस ठाण्यातील दोन पोलिस मोटारीने रुग्णालयात दाखल झाले; पण त्यांनी जखमी तरुणाकडे फारशी चौकशी केली नाही. काही वेळानंतर ते निघून गेले. मात्र रात्री उशिरापर्यंत जखमी व त्याचे समर्थक रुग्णालयातच होते. शहर पोलिसांनी खणभागात जाऊन पाहणी केली. मोडतोड झालेली वाहने ताब्यात घेतली आहेत. ती कुणाची आहेत, याचा उलगडा झालेला नाही. रात्री उशिरापर्यंत खणभागात तणाव होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुन्हा नोंद नाही शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद नव्हता. भरदिवसा घटना घडूनही शहर पोलिसांनी गांभीर्याने घेतले नव्हते. त्यामुळे हा प्रकार कशातून घडला, जखमी कोण आहेत? हल्लेखोर कोण होते? त्यांच्याकडून हत्यारे कोठून आली? याचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही. याबाबत शहर पोलिसांकडे चौकशी केली असता, त्यांनी घटना घडली आहे, परंतु तक्रार देण्यासाठी कोणी फिरकले नाही, असे सांगितले.