सांगली : शहरातील खणभाग पोलीस चौकीजवळ घरजागेच्या वादातून १० ते १५ जणांनी माय-लेकींना मारहाण करुन जखमी केेले. याप्रकरणी सुशीला वसंत जाधव यांनी पांडुरंग बापू बन्ने, संदीप पांडुरंग बन्ने यांच्यासह १० ते १५ जणांविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी जाधव व बन्ने यांच्यात घरजागेवरुन वाद आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास संशयितांनी खणभाग येथील जाधव यांच्या घरात घुसून फिर्यादी सुशीला व त्यांची मुलगी सुनीता पवार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी एका संशयिताने वीट फेकून मारली. त्यानंतर संशयितांनी घरातील वस्तूंचे व घरासमोर असलेले पत्रे व खांब काढून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.