शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

कापूसखेडमध्ये महिलेवर खुनी हल्ला

By admin | Updated: January 2, 2017 00:04 IST

गंभीर जखमी : छेडछाडीचा जाब विचारल्याने चौघांचे कृत्य

सांगली : मुलीच्या छेडछाडीबद्दल जाब विचारणाऱ्या सुनीता रामचंद्र चव्हाण (वय ४०, रा. कापूसखेड, ता. वाळवा) या महिलेवर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला. हल्लेखोर अमोल सदाशिव कोळी व त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत. शुक्रवारी ही घटना घडूनही इस्लामपूर पोलिसांनी याची दखल घेतलेली नाही.सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर, तब्बल ४२ तासांनंतर रविवारी दुपारी पोलिसांनी जखमी चव्हाण यांचा जबाब नोंदवून घेतला. हल्ल्यात जखमी झालेल्या सुनीता चव्हाण यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुुरू असून, त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. चव्हाण यांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. ८० वर्षांची आई व मुलीसोबत त्या राहतात. शुक्रवारी रात्री त्यांची मुलगी दूध संकलन केंद्रात दूध घालण्यासाठी गेली होती. त्यावेळी संशयित अमोल कोळी व त्याच्या तीन साथीदारांनी तिची छेड काढली. मुलीने घरी आल्यानंतर हा प्रकार सांगितला. यापूर्वीही संशयितांनी अनेकदा त्यांच्या मुलीची छेड काढली असल्याने, सुनीता चव्हाण याचा जाब विचारण्यासाठी संशयितांकडे गेल्या होत्या. यातून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. पोलिसांत तक्रार करतो, असे चव्हाण यांनी म्हणताच संशयितांना राग आला. त्यांनी चव्हाण यांना शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चाकूने हल्ला केला. त्यात चव्हाण गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकारी व स्थानिक पोलिसांनी इस्लामपूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. तरीही शुक्रवारी रात्रभर व शनिवारी संपूर्ण दिवसभरात इस्लामपूर पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे चव्हाण यांचा जबाब घेण्यासाठी एकही पोलिस फिरकला नाही. परिणामी, या कुटुंबास सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेची मदत घ्यावी लागली. संघटनेच्या अध्यक्ष लीलाताई जाधव, चंपाताई जाधव, जयश्री सावंत, कमल शिर्के, मंगल पाटील, गीता ठक्कर, आशा फडणवीस, सरिता कदम व भगिरथी दळवी यांनी रविवारी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांना भेटण्यासाठी पोलिस मुख्यालय गाठले; पण शिंदे यांची भेट झाली नाही. पोलिस नियंत्रण कक्षात त्यांनी निवेदन देऊन, चव्हाण यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केली. त्यानंतर इस्लामपूर पोलिसांनी पळापळ केली व तब्बल ४२ तासांनंतर चव्हाण यांचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू ठेवली. (प्रतिनिधी)३७० टाके पडले संशयितांनी पहिल्यांदा चाकूहल्ला केल्यानंतर सुनीता चव्हाण यांनी प्रतिकार केला. त्यामुळे संशयितांनी पोटावर, पायावर, डोक्यावर, मानेवर असे सात ते आठ वार केले. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडल्यानंतर संशयित पळून गेले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर अडीच तास शस्त्रक्रिया केली. यामध्ये त्यांना झालेल्या जखमेला सुमारे ३७० टाके पडले आहेत. अजूनही त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.