शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरेवाडीतील तरुणीचा खून वडिलांकडून! पतीला सोडून प्रियकराकडे राहत असल्याने कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:21 IST

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या प्रियांका काशीनाथ हाक्के (वय २०, तळसंदे, ता. हातकणंगले) या विवाहितेच्या खुनाचा छडा लावण्यात कवठेमहांकाळ पोलिसांना शुक्रवारी यश आले.

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे झालेल्या प्रियांका काशीनाथ हाक्के (वय २०, तळसंदे, ता. हातकणंगले) या विवाहितेच्या खुनाचा छडा लावण्यात कवठेमहांकाळ पोलिसांना शुक्रवारी यश आले. वडिलांनीच तिचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे. याप्रकरणी वडील हणमंत ज्ञानोबा खांडेकर (वय ३९, रा. खोतवाडी, ता. हातकणंले) यास अटक केली आहे.

वर्षापूर्वी प्रियांकाचा तळसंदे येथील काशीनाथ हाक्के याच्याशी विवाह केला होता. पण प्रियांका पतीला सोडून खोतवाडीतील तिचा प्रियकर अंबादास कुंभार याच्याकडे जात असे. अनेकदा समजावून सांगूनही प्रियांका प्रियाकरासोबत असलेले संबंध तोडण्यास तयार नव्हती. नातेवाईकांमध्ये बदनामी होईल, या भितीने तिचा खून केल्याची कबूली संशयित हणमंत खांडेकर यांनी दिली आहे. त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यास शनिवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.

प्रियांका हाक्के हिचा चार दिवसापूर्वी आरेवाडीत दगडाने ठेचून खून केल्याची उघडकीस आले होते. सुरुवातीला तिची ओळख पटली नव्हते. घटनास्थळी दुचाकी (क्र. एमएच ०९ बीएच-१२४२) सापडली होती. यावरुन तपासाला दिशा देण्यात आली होती. आरटीओ कार्यालयातून या दुचाकीचा मालक शोधल्यानंतर तो हणमंत खांडेकर निघाला. त्याला दोन दिवसापूर्वी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर प्रथम प्रियांकाच्या मृतदेहाची ओळख पटली. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर खांडेकरने स्वत:च्या मुलीचा दगडाने ठेचून खून केल्याची कबूली दिली. वर्षापूर्वी प्रियांकाचा विवाह केला होता. विवाहानंतरही तिने प्रियाकरासोबत संबंध सुरुच ठेवले. तिला अनेकदा समजावून सांगितले. पण तिच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. पतीचे घर सोडून ती प्रियकराकडे अनेकदा जात होती. पंधरा दिवसापूर्वीही ती प्रियाकडे गेल्याने पतीने तिला नांदविण्यास नकार दिला होता. नातेवाईकांमध्ये मुलीने बदनामी केली. दुसरे लग्न लाऊन दिले तर पुन्हा तिचे असेच वर्तन राहिल, असा विचार करुन खांडेकरने तिचा खून केल्याची निष्पन्न झाले आहे.सांगलीतून नेलेआठवड्यापूर्वी प्रियांकाला सांगलीत संजयनगरमधील अभिनंदन कॉलनीत राहणारे चुलते चंद्रकांत खांडेकर यांच्याकडे सोडले होते. घटनेदिवशी वडिलांनी तिला परगावी जायचे आहे, असे सांगून दुचाकीवरुन शिरढोणला आणले. तिथे त्यांनी नाष्टा केला. वडील हणमंतने मद्य प्राशन केली. तेथून आरेवाडीतील बिरोबा बनात गेले. हणमंतने झोपल्याचा बहाणा केला. प्रियांकाही गाढ झोपेत असल्याची खात्री पटल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घातला.