शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मुलांच्या भांडणातून खुनीहल्ला

By admin | Updated: March 22, 2015 00:25 IST

चौघांविरुद्ध गुन्हा : दोघांना अटक; पोलीस कोठडी

सांगली : लहान मुलांच्या भांडणावरून झालेल्या वादातून तरुणावर चाकू, लोखंडी सळई व बॅटने खुनीहल्ला केल्याची घटना संजयनगरमध्ये १८ मार्चला घडली आहे. या हल्ल्यात बाळू किसन दुधाळ (वय १९, रा. संजयनगर, सांगली) हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रमोद शिवाजी लिमगेडमाळी व विजय राजू मस्के या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी झाली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या दुधाळ याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. लहान मुलांमध्ये खेळताना भांडण झाले होते. त्यावेळी या भांडणातून बाळू दुधाळ व संशयितामध्ये चेष्टामस्करी सुरू झाली. एकमेकांची चेष्टा करताना शिवीगाळ झाल्याने त्याचे पर्यवसान वादावादी व मारामारीत झाले. संशयितांनी दुधाळवर चाकू, लोखंडी सळई व बॅटने हल्ला केला. यात दुधाळ गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला होता. संजयनगर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून संशयिताविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर प्रमोद लिमगेडमाळी व विजय मस्के या दोघांना तातडीने अटक केली, तसेच अन्य दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांना न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने लिमगेडमाळी व मस्के या दोघांना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अल्पवयीन संशयितांची बालसुधारगृहात रवानगी केली. (प्रतिनिधी)