शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा अग्निशमन विभागच संकटात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 14:22 IST

सांगली शहरात एखाद्या ठिकाणी आग लागली तर, अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचेलच याची खात्री देता येत नाही. कारण अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. गेल्या पंधरा वर्षात या विभागाच्या सक्षमीकरणाची चर्चा अधिक झाली, पण एकाही सत्ताधाऱ्यांनी अथवा आयुक्तांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी हा विभागच संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचा अग्निशमन विभागच संकटात..!

शीतल पाटील सांगली : शहरात एखाद्या ठिकाणी आग लागली तर, अग्निशमन दलाची गाडी वेळेवर पोहोचेलच याची खात्री देता येत नाही. कारण अग्निशमन दलाकडे मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. गेल्या पंधरा वर्षात या विभागाच्या सक्षमीकरणाची चर्चा अधिक झाली, पण एकाही सत्ताधाऱ्यांनी अथवा आयुक्तांनी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांअभावी हा विभागच संकटात सापडला आहे.सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांची लोकसंख्या सहा लाखांच्या घरात पोहोचली आहे. पन्नास हजार लोकसंख्येमागे एक अग्निशमन बंब, त्यावर एका शिफ्टसाठी सहा कर्मचारी, अशी सर्वसाधारण रचना अग्निशमन दलाची आहे. पण सांगलीचा विचार करता, शासनाच्या आदर्श नियमावलीलाही लाजवेल, अशी स्थिती आहे.

सात अग्निशमन बंब, चार ते पाच शववाहिका, त्यावर काम करणारे चाळीसभर कर्मचारी, अशा कमकुवत आधारावर शहरात आपत्ती व्यवस्थापनाचे काम या विभागाला करावे लागत आहे. सध्या महापालिकेकडे ११ कायम फायरमन, दोन लिडिंग फायरमन, ५ क्लिनर, ५ वाहनचालक असा ताफा आहे. तर मानधनावर ३८ चालक व फायरमन घेण्यात आले आहेत. एकूण ७१ जणांचा स्टाफ तीन शिफ्टमध्ये काम करीत आहे.एका बंबामागे सहा कर्मचारी असे गणित घातले, तर एका शिफ्टसाठी किमान ४२ कर्मचाऱ्यांची, तर तीन शिफ्टसाठी १२६ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यात कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टीचा विचार करता, आणखी २० ते ३० कर्मचाऱ्यांची या विभागाला गरज आहे. पण गेल्या पंधरा वर्षात या विभागात भरती प्रक्रियाच झालेली नाही.

काही कर्मचाऱ्यांना तर आरोग्य व इतर विभागाकडे कामाला पाठविले जाते. आस्थापनेवरील काही कर्मचारी तर कायम गैरहजर असतात. त्यामुळे या विभागाला उपलब्ध कर्मचारी व अधिकाऱ्यांवरच नागरिकांना सेवा देण्याची कसरत करावी लागते. 

टॅग्स :fire brigade puneपुणे अग्निशामक दलSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका