शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

जत नगरपालिकेत नगरसेवकाला कानशिलात लगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:09 IST

जत : विकासकामांसंदर्भात जत नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांत झालेली चर्चा शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारीने गाजली. सत्ताधारी गटातील ...

ठळक मुद्देसत्ताधारी-विरोधकांत विकासकामांवरून वाद -हमरीतुमरी, तणाव

जत : विकासकामांसंदर्भात जत नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांत झालेली चर्चा शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारीने गाजली. सत्ताधारी गटातील नगरसेवकाने विरोधी गटातील नगरसेवकाला कानशिलात लगावली. यामुळे नगरपालिकेतील वातावरण काहीवेळ तणावपूर्ण झाले. इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत वाद मिटविला.

यासंदर्भात जत पोलिसात कोणत्याही स्वरूपाची तक्रार रात्री उशिरापर्यंत दाखल झाली नाही. परंतु या घटनेची जत नगरपालिकेसह शहरातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सत्ताधारी गटातील काही नगरसेवक नगरपालिका सभागृहात बसले असता, विरोधी गटातील एक नगरसेवक तेथे आले व सत्ताधारी गटातील नगरसेवकांसोबत विकास कामासंदर्भात चर्चा करू लागले. सत्ताधारी गटातून माझी अडवणूक होऊ लागली आहे, असा त्यांनी आरोप केला. मात्र, सत्ताधारी गटाच्या माजी नगराध्यक्षांनी तुम्हीच विकास कामाला खो घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे सांगितले. यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. उपस्थित नगरसेवकांनी त्या विरोधी सदस्यास समजावून सांगून परत पाठवले.

या प्रकारानंतर विरोधी नगरसेवकाने त्यांच्या गटातील नगरसेवकांना बोलावून घेतले. ते सर्वजण नगरपालिका सभागृहात आले. वाद मिटला असताना पुन्हा का आलात, असा जाब सत्ताधारी नगरसेवकांनी विचारला. यावरून पुन्हा वाद झाला आणि सत्ताधारी नगरसेवकाने विरोधी नगरसेवकांच्या कानशिलात लगावली. यामुळे पालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले.विरोधकांनी भूमिका बदलावी : बन्नेनवारकाही विरोधी नगरसेवक ठेकेदारांना हाताशी धरून विकासकामांना खो घालण्यासाठी कमी दराने निविदा भरत आहेत. तसेच न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची भूमिका ही सामंजस्याची आहे. विरोधकांना सहकार्य करत आहोत. त्यांनी आपल्या भूमिकेत बदल करावा, असे मत नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवार व उपनगराध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली