शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पोलिसांची बंद घरे फोडली!

By admin | Updated: July 23, 2016 00:07 IST

बोपेगावमध्ये अकरा घरफोड्या : घरमालक परगावी असल्याने चोरीची रक्कम अस्पष्ट

कवठे : मुंबई पोलिस खात्यात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गावाकडील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे. वाई तालुक्यातील बोपेगाव येथे गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घालत अकरा बंद घरे फोडली. घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकले. यापैकी बहुतांश घरमालक मुंबई पोलिसांत कार्यरत आहेत. बोपेगाव येथे शुक्रवारी रात्री अकरा घरे चोरट्यांनी पाळत ठेवून फोडली. त्यातील नऊ घरमालक मुंबई व एक सातारा येथे नोकरीस असल्याने चोरीला गेलेल्या ऐवजाची रक्कम समजू शकली नाही. शामराव जाधव यांचे बंधू राजेंद्र तसेच आनंदराव जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजी जाधव हेसुद्धा मुंबई पोलिस दलात अधिकारी आहेत. संजय जाधव, कैलास कीर्दत, सुभाष कीर्दत, सुधीर जाधव, बाळासाहेब जाधव व हेमंत तरडे हेही मुंबई येथे नोकरीनिमित्त असून, यांच्याही घरातील कोणत्या वस्तू चोरीला गेल्या, हे समजू शकले नाही. सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार, डी. एच. पावरा व एल. बी. डोंबाळे तपास करत आहेत. (वार्ताहर)तीन घरे अधिकाऱ्यांचीचोरी झालेल्यांमध्ये राजेंद्र जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजी जाधव हे पोलिस उपनिरीक्षक आहेत. तर इतर तीन पोलिस असे सात पोलिसांची घरे फोडली आहेत.रक्ताचे डाग अन् टिकावशिवाजी जाधव यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला. त्यामध्ये त्यांना यश आले नाही. आनंदराव जाधव यांच्या घरी रक्ताचे डाग व इतर घरांजवळ चोरीत वापरलेले टिकाव व चपला आढळले.बंद घरांची दारे व कुलपे उघडलेल्या अवस्थेत समजल्यानंतर पाहणी केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. घटनेच्या दिवशी दुपारी दोन अनोळखी पुरुष व महिला गावातून फिरताना ग्रामस्थांनी पहिले असून, त्यांच्यावर आमचा संशय आहे.- राजेंद्र शिंदे, पोलिस पाटील, बोपेगावरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याचा बराच वेळ आवाज येत असताना माझ्या घराची कडी काढत असल्याचा आवाज आला. त्यामुळे मी ‘कोण आहे’ म्हणून आवाज दिला. त्यानंतर चोर घरापासून निघून गेले. - विलास जाधव, ग्रामस्थ, बोपेगाव