शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका बजेटमध्ये शिळ्या कढीला ऊत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:16 IST

सांगली महापालिकेतील भाजपच्या पहिल्याच अर्थसंकल्पात काही नव्या योजनांचा समावेश असल्याचा दावा केला जात असला, तरी या योजना वर्षानुवर्षे महापालिकेच्या अजेंड्यावर राहिल्या आहेत. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देमहापालिका बजेटमध्ये शिळ्या कढीला ऊत! नव्या योजना वर्षानुवर्षे महापालिकेच्या अजेंड्यावर

शीतल पाटील सांगली : महापालिकेतील भाजपच्या पहिल्याच अर्थसंकल्पात काही नव्या योजनांचा समावेश असल्याचा दावा केला जात असला, तरी या योजना वर्षानुवर्षे महापालिकेच्या अजेंड्यावर राहिल्या आहेत. त्यामुळे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याचे दिसून येते.

कृष्णा नदी प्रदूषण मुक्तीच्या घोषणा यापूर्वीही अनेकदा झाल्या; पण ठोस कृती झालेली नाही. प्रभाग समित्यांचे अधिकारीच नामधारी असताना त्या सक्षम कशा करणार? असा सवाल आहे. घनकचरा, वाहतूक, पार्किंग, पाण्याचा निचरा यासारख्या महत्त्वाच्या बाबींवरील भूमिकाही अस्पष्टच आहे.महापालिकेचा ७६७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महासभेकडे सादर झाला. त्यात महासभेकडून आणखी वाढ होऊन ८०० कोटींपर्यंत जाईलही. पण वास्तव वेगळेच आहे. महापालिकेचे उत्पन्न २०० ते २२५ कोटींच्या घरात आहे. त्यात शासनाकडून प्राप्त निधीचा विचार केला, तर ३०० कोटींपर्यंत बजेट जाईल.

यात प्रशासकीय खर्च व शासकीय योजनांमधील महापालिकेचा हिस्सा वगळता विकासासाठी १०० कोटींच्या आसपास निधी शिल्लक राहतो. या पैशावरच महापालिकेचे आर्थिक गणित फिरत असते. त्यामुळे नव्या योजना, सत्ताधाऱ्यांच्या संकल्पना अमलात आणण्यासाठी शासकीय अनुदानाच्या कुबड्यावर अवलंबून रहावे लागते. तरीही दरवर्षी महापालिकेचे बजेट मात्र कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असते.

यंदाही त्यात फारसा फरक जाणवत नाही. भाजपच्या सत्ताकाळातील पहिलेच बजेट असल्याने साऱ्यांचेच लक्ष याकडे लागले होते. पण बजेटमध्ये फार मोठ्या घोषणा झाल्या नाहीत. कृष्णा नदी प्रदूषण मुक्तीचा विषय कित्येक वर्षांपासून सुरू आहे.धुळगाव योजनेची संकल्पना यातून आली होती. तरीही नदीचे प्रदूषण रोखण्यात महापालिकेला यश आलेले नाही. आता नदीत मिसळणाऱ्या नाल्यावर सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा (एसटीपी) उभारण्यासाठी तीन कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे भविष्यात शेरीनाला-धुळगाव योजनेचे भवितव्यच धोक्यात येणार असून, त्यावर झालेला ३० ते ४० कोटींचा खर्च पाण्यात जाणार आहे.

प्रभाग समिती सक्षम करण्यासाठी ८ कोटींची तरतूद केली आहे. म्हणजे प्रत्येक प्रभाग समितीला दोन कोटीचा निधी मिळणार आहे. यापूर्वीही कोटी, दीडकोटीचा निधी प्रभाग समित्यांना मिळतच होता. त्यातून गटारी, पेव्हिंग अशा किरकोळ कामांवर निधी खर्च करण्यात नगरसेवकांना रस होता. त्यात प्रभाग अधिकाºयांचे अधिकारच काढून घेतले आहेत. सध्या ते केवळ नामधारी उरले आहेत.अशा स्थितीत प्रभाग समित्या कशा सक्षम होणार? असा प्रश्न आहे. मिरजेतील गणेश तलाव, पुतळे सुशोभिकरण, भाजी मंडई, रस्ते, गटारी, सांस्कृतिक भवन, सभागृह, उद्याने यासारख्या जुन्याच योजनांवर पुन्हा भर दिला आहे. त्यातही केवळ आकड्यांचा खेळच अधिक दिसून येतो.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली