शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

सीमा सुरक्षा दलात आता 'मुधोळ हाऊंड' श्वानांचा वापर; पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये केले होते कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 16:10 IST

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनीही आपल्या सैन्यात मुधोळ श्वानांचा वापर केला होता

संदीप परांजपेशिरगुप्पी : कर्नाटकातील मुधोळ हाऊंड प्रजातीचा श्वान आणि उत्तर प्रदेशातील रामपूर येथील देशी जातीच्या एकूण १५० श्वानांना प्रथमच सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर आणि नक्षलग्रस्त भागातील धोकादायक कमांडो ऑपरेशन्समध्ये या दोन्ही प्रजातींच्या श्वानांचा वापर करण्यात येणार आहे.सन २०१८ मध्ये मध्य प्रदेशातील टेकानसूर येथील बीएसएफच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलात देशी प्रजातींचे श्वान तैनात करण्याची सूचना केली होती. त्यानुसार बीएसएफने कार्यवाही केली. मुधोळ तालुक्यातील रामपूर येथील मुधोळ हाउंडच्या श्वानांना प्रशिक्षण देऊन त्यांना दलात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.मुधोळ श्वानांचे अस्तित्व प्राचीन काळापासून असल्याचे सांगितले जाते. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ परिसरात हा श्वान आढळून आला. इतिहासात संस्थानिकांच्या काळात त्यांचा वापर संरक्षणासाठी केला त्यचा. मुधोळ येथील मालोजीराव घोरपडे यांनी मुधोळ श्वानाला लोकप्रियता मिळवून दिली होती. सध्या तिम्मापुरा येथे एक श्वान प्रजनन केंद्र अस्तित्वात आहे.

मन की बातमध्येही प्रशंसापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बातमध्ये मुधोळ श्वानाचे कौतुक केले होते. २०२० मध्ये मोदी यांनी `स्वावलंबी भारतात लोकांना घरात श्वान पाळायचे असतील तर मुधोळसह देशी जाती आणा` असे आवाहन केले होते. यानंतर, मुधोळ श्वानांची मागणी आणखी वाढली आहे.

राष्ट्राच्या सेवेत सुरुवातीपासून सहभागस्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनीही आपल्या सैन्यात मुधोळ श्वानांचा वापर केला होता. त्यांच्या काळात विविध लढाया, आक्रमणे व शिकारींमध्ये या श्वानांनी भाग घेतला होता. अलिकडच्या काळात भारतीय सैन्यातही मुधोळ हाउंड्सची सेवा सुरू आहे. सैन्यासोबतच मुधोळ हाउंड्सना सशस्त्र सीमा बल, राजस्थान, केंद्रीय राखीव पोलिस दल, बंगळुरू, सीआयएसएफ श्री हरिकोटा यासह विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

मुधोळ श्वानाची वैशिष्ट्येसडपातळ शरीरयष्टी, लांबट चेहरा आणि लांब पाय हे मुधोळ श्वानांचे खास वैशिष्ट्य आहे. डॉ. सुरेश होनप्पागोल नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना परिश्रमपूर्वक तयार केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mudhol Hound dogs join Indian border security after PM's praise.

Web Summary : BSF trains Mudhol Hounds for border security, inspired by PM Modi. These indigenous dogs, known for their agility, served Shivaji Maharaj and are now deployed in sensitive operations.