आष्टा येथे पोलीस ठाण्यास श्री चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सॅनिटायझर स्टँड व कोरोना प्रतिबंधक औषधे देण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अजित सिद, यू. जी. देसाई, प्रदीप पाटील, डॉ. प्रकाश आडमुठे, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरातील श्री चॅरिटेबल ट्रस्टने महापुरासह कोरोना संकटकाळात आष्टा शहर व परिसरातील गोरगरीब, वंचितांना मदतीचा हात देऊन सामाजिक भान जपले आहे, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी केले.
आष्टा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सॅनिटायझर स्टँड व कोरोना प्रतिबंधक औषधे देण्यात आली. यावेळी अजित सिद बोलत होते. सहायक पोलीस निरीक्षक यू. जी. देसाई, पोलीस उपनिरीक्षक दीपक सदामते, संजय सनदी, अवधूत भाट यांच्यासह आष्टा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सॅनिटायझर स्टँडसह सॅनिटायझर व कोरोना प्रतिबंधक औषधे यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष प्रदीप पाटील, डॉ. प्रकाश आडमुठे, सचिन दमामे, सुरेंद्र शिराळकर, आमिर फकीर, चेतन फडतरे, अभिनंदन पाटील, संजय लोखंडे, महेश गुरव व सहकारी उपस्थित होते.
डॉ. प्रकाश आडमुठे यांनी श्री चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, संगणक यांसह स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गोरगरिबांना मदतीचा हात देतानाच संकटाच्या काळात सहकार्य केले आहे, असे सांगितले.