शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ठिय्या आंदोलनास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:40 IST

सांगली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारपासून सांगलीत बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आता माघार नाही, असा इशारा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तालुक्यातील तहसील कार्यालये, तसेच ग्रामपंचायतींसमोरही ...

सांगली : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे मंगळवारपासून सांगलीत बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आता माघार नाही, असा इशारा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तालुक्यातील तहसील कार्यालये, तसेच ग्रामपंचायतींसमोरही निदर्शने करण्यात आली.दररोज दोन-चार तरुण जीवनयात्रा संपवित आहेत. तरीही शासन जाणून-बुजून आरक्षणाचा हा मुद्दा लांबणीवर टाकत आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी मेगा भरतीला स्थगिती देत, राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात मेगा भरती रद्द करावी अथवा स्थगिती द्यावी, अशी कोणतीही मागणी मराठा समाजाने केली नव्हती. तरीही ही स्थगिती देऊन मुख्यमंत्र्यांनी रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळेच येत्या नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याची त्यांची घोषणाही फसवी असल्यानेच, आता आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली. दिवसभर अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाºयांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, रवी खराडे, अजय देशमुख, रवींद्र काळोखे, श्रीरंग पाटील, शहाजी भोसले, महेश खराडे, महेश घार्गे, रोहित शिंदे, अनिल शेख, संजय भोसले, राहुल पाटील, धनंजय वाघ, प्रशांत भोसले, शेखर माने आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.ग्रामसेवकांचा सत्कारडॉ. संजय पाटील म्हणाले, गुरुवार, दि. ९ आॅगस्ट रोजी आंदोलन व्यापक केले जाणार आहे. जिल्ह्यातील गावोगावच्या कार्यकर्त्यांनी यादिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करावीत. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन ग्रामसेवकांना द्यावे. तसेच ग्रामसेवकाचा टॉवेल, टोपी व नारळ देऊन सत्कार करावा. सरपंचांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे.