शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

कोकरुड येथील आंदोलन चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 15:44 IST

कोकरुड : कोकरुड येथील सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्यावर केरु महादेव जाधव यांना मारहाण व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कोकरुड व माळेवाड़ी येथे गुरुवारी कडकडित बंद पाळण्यात आला, परंतु २0 त २५ आंदोलकांना बळाचा वापर करत ताब्यात घेत पोलिसांनी हे आंदोलन चिरडले.कोकरुड येथील पोलिस ठाण्याजवळील माळावर जनावरे चरण्यास घेऊन आलेल्या ...

ठळक मुद्दे घटनेच्या निषेधार्थ कोकरुड, माळेवाडीत बंद, रास्ता रोको सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी लगावल्या वृध्दाच्या कानशिलातसांगली येथील दंगल नियंत्रण पथक कोकरुड मधे दाखलबळाचा वापर करत पोलिसांनी घेतले ताब्यात

कोकरुड : कोकरुड येथील सहायक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्यावर केरु महादेव जाधव यांना मारहाण व शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कोकरुड व माळेवाड़ी येथे गुरुवारी कडकडित बंद पाळण्यात आला, परंतु २0 त २५ आंदोलकांना बळाचा वापर करत ताब्यात घेत पोलिसांनी हे आंदोलन चिरडले.

कोकरुड येथील पोलिस ठाण्याजवळील माळावर जनावरे चरण्यास घेऊन आलेल्या एका शेतकºयास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल झाली होती. माळेवाडीतील शेतकरी केरू महादेव जाधव (वय ७८) यांनी फिर्याद दिल्यानंतर तसेच ग्रामस्थांच्या दबावानंतर शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकारणाच्या निषेधार्थ गुरुवारी कोकरुड आणि माळेवाडी येथे बंद पुकारण्यात आला होता.

दरम्यान, कोकरुड येथे रास्ता रोको करणाºया आंदोलकांनी जो पर्यंत अधिकाºयांचे निलंबन होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका घेतल्याने २0 त २५ आंदोलक स्त्री-पुरुषांना बळाचा वापर करत पोलिसांनी ताब्यात घेत हे आंदोलन चिरडले. आंदोलकांना पोलिस गाडीत बसवून नेण्यात आले. सांगली येथील दंगल नियंत्रण पथक कोकरुड मधे दाखल झाले होते.माळेवाडी-कोकरुड येथील वयोवृध्द शेतकरी केरू महादेव जाधव हे कोकरुड पोलिस स्टेशनच्या लगत असणाºया माळावर बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास जनावरे चरावयास घेऊन गेले होते. जनावरे चरत असताना पोलिस स्टेशनच्या दोन कर्मचाºयांनी जाधव यास साहेब बोलावत असल्याचे सांगितले. त्यानंतर केरू जाधव पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी भगवान शिंदे यांनी ह्यये थेरड्या, इकडे जनावरे का चरायला आणला आहेस असे म्हणत त्याच्या कानशिलात लगावल्या. यामुळे जाधव जमिनीवर कोसळले.हा प्रकार काही ग्रामस्थांनी पाहिला व त्यांनी गावात याबाबतची माहिती सर्वांना दिली. त्यानंतर कोकरुड व माळेवाडी येथील सर्व आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याच्या आवारात धाव घेतली. त्यावेळी जाधव हे चक्कर येऊन पडल्याचे सांगण्यात आले. यावर लोकांचा विश्वास न बसल्याने जाधव यांच्याकडून माहिती घेतली असता, शिंदे यांनी मारहाण आणि शिवीगाळ केली. यामुळेच आपण बेशुध्द पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यानंतर शिंदे यांच्याकडे विचारणा केली; मात्र त्यांनी मारहाण व शिवीगाळ केली नसल्याचे सांगितले. शिंदे हे खोटे बोलत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांनी दोन तास घेराव घातल्यानंतर शिंदे यांच्यावर त्यांच्याच पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला.या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी कोकरुड व माळेवाडी बंद ठेवण्यात आले.