शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे आत्तापर्यंत सोळा हजारांहून अधिक पंचनामे : जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 11:21 IST

Flood Sangli Collector : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 113 गावांमधील आतापर्यंत 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. बाधित गावातील कुंटुंबे, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

ठळक मुद्देमहापुरामुळे झालेल्या नुकसानीचे आत्तापर्यंत सोळा हजारांहून अधिक पंचनामे : जिल्हाधिकारी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी यंत्रणा गतिमान

सांगली : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 113 गावांमधील आतापर्यंत 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. बाधित गावातील कुंटुंबे, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे , ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील 113 गावे बाधित झाले आहेत. महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण क्षेत्रातील एकूण 45 हजार 352 कुटुंबे बाधित झाली आहेत.

शासन निर्देशानुसार बाधित गावातील कुटुंबे , कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत .यामध्ये आज अखेर 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

त्यामध्ये पूर्ण नष्ट झालेली कच्ची घरे 279, पक्की घरे 8, अशंत नष्ट झालेली कच्ची घरे 1 हजार 78, पक्की घरे 320, नुकसान झालेल्या झोपड्या 34 व गोठे 619 आहेत. अजूनही पंचनामे सुरू असून ते गतीने पूर्ण करण्यासाठी यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.आज अखेर मयत पशुधनापैकी 96 लहान, माठे जनावरे व 49508 पक्षांचे पंचनामे करण्यात आले आहेत. तसेच आज अखेर 27 कारागीरांचे सहयंत्राचे, 39 कारागीरांच्यां कच्चा व तयार मालाचे व 2279 छोटे उद्योग, दुकाने, टपरीधारक, हातगाडीधारक इत्यादीचे पंचनामे नुसार नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या बाबींचे पंचनामेदेखील अजूनही सुरू आहेत.जिल्ह्यात महापूरामुळे 274 गावांतील 97 हजार 486 शेतकऱ्यांचे 40 हजार 671 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. आज अखेर 174 गावांतील 24 हजार 781 शेतकऱ्यांचे 8 हजार 508.72 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

  • मिरज तालुक्यातील 26 गावांतील 29 हजार 117 शेतकऱ्यांचे 10 हजार 340 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी 21 गावांतील 3 हजार 712 शेतकऱ्यांचे 1 हजार 728.64 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
  • वाळवा तालुक्यातील 98 गावांतील 31 हजार 245 शेतकऱ्यांचे 13 हजार 495 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी 41गावांतील 7 हजार 701 शेतकऱ्यांचे 2 हजार 697.60 हेक्टर पंचनामे पूर्ण झाले आहेत.
  • शिराळा तालुक्यातील 95 गावांतील 15 हजार 350 शेतकऱ्यांचे 6 हजार 631 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे त्यापैकी 87 गावांतील 8 हजार 786 शेतकऱ्यांचे 1 हजार 893.61 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
  • पलूस तालुक्यातील 26 गावांतील 21 हजार 595 शेतकऱ्यांचे 10 हजार 146 हेक्टर बाधित झाले आहे त्यापैकी 23 गावांतील 4 हजार 523 शेतकऱ्यांचे 2 हजार 162.18 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
  • तासगाव तालुक्यातील 2 गावांतील 179 शेतकऱ्यांचे 59 हेक्टर बाधित झाले आहे त्यापैकी 2 गावांतील 59 शेतकऱ्यांचे 26.69 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
टॅग्स :floodपूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली