शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कारभार सुधारा, अन्यथा गोपनीय अहवाल खराब करु; मंत्री सुरेश खाडे यांचा अधिकाऱ्यांना दम 

By अशोक डोंबाळे | Updated: September 11, 2023 19:07 IST

अपुरा निधी खर्च, प्रलंबित विकास कामावरून अधिकाऱ्यांची झाडाझडती

सांगली : निधी प्राप्त होऊनही जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे कामे अपूर्ण असल्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. निधी वेळेवर खर्च होत नाही, वरिष्ठ सूचनांकडेही अधिकारी लक्ष देत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कामात हलगर्जीपणा केल्यास गोपनीय अहवाल खराब करण्यात येईल, असा दमही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.पालकमंत्री खाडे यांनी सोमवारी जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी  खासदार संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेत खाडे यांनी बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, महिला बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन अशा सर्व विभागांच्या कारभारात ढिसाळपणा आल्याचे त्यांच्या लक्षात आले. बांधकाम विभागाचे ९५ टक्के कामे अपूर्ण आहेत. आरोग्य विभागाचा निम्मा निधी खर्च झाला आहे. जलजीवन मिशनची कामे अपूर्ण आहेत. महिला बालकल्याणचा दहा टक्के निधी खर्च झाला आहे. समाज कल्याणची कामेही अपूर्ण आहेत. कृषी आणि पशुसंवर्धनचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांना त्यांच्या विभागाची पुरेशी माहितीही नव्हती.

आरोग्य आणि शिक्षण विभागाची बऱ्यापैकी कामे प्रगतीवर आहेत. मात्र इतर विभागांचा कारभार फारच ढिसाळ असल्याचे दिसून आले. या विभागांना विविध योजनांचा शासकीय निधी वर्ग झाला आहे. मात्र तो खर्च केला नसल्याचे समोर आले. त्यामुळे पालकमंत्री खाडे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.ते म्हणाले, पैसे आले, पैसे काढले तर कामे झाली पाहिजेत. कामात हलगर्जीपणा केला तर गोपनीय अहवाल खराब करण्यात येईल, असा दमही त्यांनी दिला.

आमदार, खासदार का नाहीत?बैठकीला जिल्ह्यातील आमदार, खासदार यांना बोलवले नसल्याचे लक्षात आल्यावर पालकमंत्री खाडे नाराज झाले. ते म्हणाले, आढावा बैठकीला आमदार, खासदार सर्वांना बोलावले पाहिजे. का बोलावले नाही? प्रोटोकॉल आहे, माहिती नाही का? आमदार, खासदारांच्या विभागाचे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याची त्यांची इच्छा असते. जिल्हा परिषद सदस्य नसले तरी आमदार, खासदार आहेत. यावर अधिकारी एक शब्दही बोलले नाहीत.

टॅग्स :Sangliसांगली