भडकंबे येथे राजारामबापू सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्या स्मृतीस्थळाचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच सुधीर पाटील, विनायकराव पाटील, संजय पाटील, देवराज पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाच्या महामारीत आपण अनेक जीवाभावाच्या सहकाऱ्यांना गमावले असून, त्यांची आठवण कायम राहील, असे भावविवश उद्गार जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ‘मॉडेल स्कूल’च्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भडकंबे (ता. वाळवा) येथे राजारामबापू सहकारी दूध संघाचे माजी उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्या स्मृतीस्थळासह गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, देवराज पाटील, सुस्मिता जाधव उपस्थित होते.
यावेळी विनायक पाटील, सरपंच सुधीर पाटील, भानुदास पाटील, सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. डॉक्टरेट पदवी मिळवल्याबद्दल संतोष पाटील, अशोक पाटील, कल्याण बामणे, नामदेव जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, ॲड. विश्वासराव पाटील, रणजित पाटील, अपर तहसीलदार दीक्षांत देशपांडे, प्रदीपकुमार पाटील, राजश्री एटम, आनंदराव पाटील, व्यंकटराव पाटील, प्रियांका पाटील, उपसरपंच मीनाक्षी भोईटे यावेळी उपस्थित होते. शरद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.