शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-मिरज येथील दर्गाह परिसरात जमावबंदी आदेश जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 15:23 IST

कोरोना विषाणूपासून गर्दीव्दारे संसर्ग होऊ नये याकरीता उपविभागीय दंडाधिकारी मिरज समीर शिंगटे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये जमावबंदी आदेश जारी केला आहे.

ठळक मुद्देमिरज येथील दर्गाह परिसरात जमावबंदी आदेश जारी नागरिकांना, भाविकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई

सांगली : कोरोना विषाणूपासून गर्दीव्दारे संसर्ग होऊ नये याकरीता उपविभागीय दंडाधिकारी मिरज समीर शिंगटे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) अन्वये जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार दिनांक 18 मार्च 2020 रोजीचे रात्री 24.00 ते 31 मार्च 2020 रोजीचे रात्री 24.00 अखेर मिरज येथील हजरत पीर सय्यद शमना मीरासाहेब (रह) दर्गाह इमारत व दर्गाह पासून 100 मी. च्या परिसरात नागरिकांना, भाविकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई केली आहे.तसेच सदर कालावधीमध्ये दर्गाह पूजा, दर्शनासाठी कोणत्याही नागरिकांना प्रवेश करता येणार नाही. तथापि सदर दर्गाहाची नियमीत पूजा करण्यासाठी नियुक्त असणारे पुजारी यांना एका दिवशी एकावेळी कमाल 10 व्यक्तीसह पुजा करता येईल.

सदर पूजेच्या वेळी अन्य नागरिकांना पुजा पाहण्यासाठी अथवा दर्गाह प्रवेशासाठी मनाई केली आहे. दर्गाह सरपंच / पंच कमिटी यांनी या आदेशाचे पालन करावे, तसेच या आदेशाची प्रसिध्दी करावी. दररोज नियमीत पुजेसाठी नियुक्त पुजारी यांची यादी स्थानिक पोलीस ठाणे अधिकारी यांना देवून पुजेची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 अन्वये यावेळचा हजरत पीर सय्यद शमना मीरासाहेब (रह) दर्गाह, मिरज च्या उरूसाच्या कार्यक्रमाची परवानगी दिलेली नाही.

या आदेशान्वये उक्त ठिकाणी जमावबंदी करण्यात येत आहे. त्यामुळे दर्गाहच्या ऊरूसाचे संगीत कार्यक्रम, गलेफ मिरवणूक, दर्शन, नागरीका मार्फत पुजेचे विशेष विधी इत्यादी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना अथवा भाविकांना एकत्र येवून गर्दी करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे.या आदेशातील तरतुदींचा भंग करणाऱ्या व्यक्ती / संस्थेविरूध्द बंदोबस्तास असणाऱ्या प्रभारी पोलीस अधिकारी / कर्मचारी यांनी तात्काळ फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी, असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी मिरज समीर शिंगटे यांनी दिले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmiraj-acमिरजSangliसांगली