सांगलीतून मोबाईलची चोरी
सांगली : शहरातील करमरकर चौकातून चोरट्याने मोबाईल चोरून नेला. ही घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबत विजय कांबळे (वय ५५, रा. रामनगर, कोल्हापूर रोड) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
-------
पार्किंगमधून सायकलची चोरी
सांगली : गव्हर्मेंट काॅलनीत अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली सायकल चोरट्याने चोरून नेली. ही घटना २५ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत शिरीष चंद्रशेखर भोसले (वय ३१) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.
------
शामरावनगरला दागिन्यांसह वाहनाच्या बॅटऱ्या चोरीला
सांगली : शामरावनगर येथील मदरसा परिसरातून छोटा हत्ती या वाहनाच्या बॅटऱ्या व सोन्याचे दागिने असा २५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी वसीम शहनाज नदाफ (वय ३१, रा. शामरावनगर) याने शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वसीम नदाफ हे वाहनचालक आहेत. त्यांच्या मालकीचा छोटा हत्ती २५ रोजी त्यांनी घरासमोर पार्क केला होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या वाहनाची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तसेच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या जलानीगौस पठाण यांच्या तीनचाकी वाहनाची बॅटरी चोरट्याने काढून नेली. याच परिसरातील एका गिरणीत चोरट्याने हात साफ केला तसेच रशीद जमादार यांच्या बंद घरातून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. चोरट्याने २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
-
हद्दपारीतील आरोपीला अटक
सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील नीलेश नरसू फाकडे (वय २५) याला सांगलीसह तीन जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो विनापरवाना फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. नीलेश फाकडे हा आपल्या साथीदारांच्या मदतीने गुन्हेगारी कारवाया करत होता. सांगली ग्रामीण, सांगली शहर आणि कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खुनाचा प्रयत्न, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, मारहाण, दरोडा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे सात गुन्हे दाखल आहेत. वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार अधीक्षक गेडाम यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यापैकी नीलेश हा हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात विनापरवाना फिरत असताना मिळून आला. याबाबत एलसीबीचे चेतन महाजन यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.