शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत एटीएम फोडले, रखवालदाराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 16:13 IST

मिरजेत बँक आॅफ इंडियाचे एटीएम यंत्र फोडून अज्ञात चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय ६०) या रखवालदाराची हत्या केली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

मिरज - मिरजेत बँक आॅफ इंडियाचे एटीएम यंत्र फोडून अज्ञात चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय ६०) या रखवालदाराची हत्या केली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडलेली ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. शहरातील प्रमुख रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. शिवाजी रस्त्यावर बँक आॅफ इंडियाची शाखा व एटीएम आहे. एटीएमवर रात्रपाळीला राजाराम जाधव हे रखवालदार होते. मध्यरात्री एटीएममध्ये शिरलेल्या चोरट्यांनी जाधव यांच्या डोक्यात काठीने वार करून एटीएम यंत्र फोडले. मात्र एटीएममधील कॅश बॉक्स चोरट्यांना फोडता न आल्याने सुमारे दहा लाखांची रक्कम बचावली. सकाळी एटीएम यंत्र फोडल्याची व रखवालदार राजाराम जाधव याची हत्या झाल्याचे समजताच बँक अधिका-यांनी पोलिसांना माहिती दिली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.जाधव याच्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेली काठी मृतदेहाजवळ होती. डोक्यात काठीच्या फटक्याने खुर्चीवर बसलेल्या ठिकाणीच जाधव याचा दुर्देवी मृत्यू झाला. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेºयात दोन चोरटे एटीएम यंत्र फोडताना दिसून आले आहेत. रात्री एक ते तीनदरम्यान हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. एटीएम फोडून रखवालदाराच्या हत्येचे वृत्त समजताच सकाळी बँकेसमोर मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा