शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव २१ सप्टेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात यावर्षी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील नॅश न्युबर्ट यांचे बासरीवादन होणार आहे.या संगीत महोत्सवाचे उद्घाटन गुरूवार दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. संगीत महोत्सवात ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ ...

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात यावर्षी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील नॅश न्युबर्ट यांचे बासरीवादन होणार आहे.या संगीत महोत्सवाचे उद्घाटन गुरूवार दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. संगीत महोत्सवात ‘संगीतकार राम कदम पुरस्कार’ मराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना व ‘डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार’ तबलावादक धनश्री नागेशकर (मुंबई) यांना देण्यात येणार आहे.अंबाबाई संगीत महोत्सवात दि. २१ ते ३० सप्टेंबर या कालावधित दिग्गज कलाकार गायन-वादन व नृत्य सादर करणार आहेत. दि. २२ रोजी मिरजेचे संगीतकार राम कदम पुरस्कार उत्तरा केळकर यांना महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती अनिता सगरे यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. तसेच दि. २३ रोजी विख्यात तबलावादक डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार महिला तबलावादक धनश्री नागेशकर यांना धर्मादाय उपायुक्त महावीर जोगी व उद्योजक जितेनभाई झवेरी यांच्याहस्ते देण्यात येणार आहे.गौरी पाठारे यांच्या शास्त्रीय गायनाने संगीत महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. संगीत महोत्सवात संगीतकार राम कदम यांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम, धनश्री नागेशकर यांचे सोलो तबलावादन, स्वानंदी सडोलीकर (सांगली), पंडित सुहास व्यास (पुणे), शिल्पा प्राणी (पुणे), रेवा नातू (पुणे), प्रवीण कारदगी (बेंगलोर), समीर अभ्यंकर (मुंबई), मंगला जोशी (सांगली), पौर्णिमा कुलकर्णी (बेंगलोर), धनंजय जोशी (नांदेड), प्रसाद खापर्डे (नाशिक), माया मोटेगावकर (मुंबई), पंडित ऋषिकेश बोडस, चंदना देशपांडे (मिरज), पंडित कृष्णेंद्र वाडीकर (हुबळी) यांचे शास्त्रीय गायन, तसेच वरदा बेडेकर (गोवा) यांचे कथ्थक नृत्य, सप्तर्षी हजरा (कोलकाता) यांचे सतारवादन, केतकी बेडेकर (मिरज) यांचे भरतनाट्यम् नृत्य, विश्वेश भोसले व वेदांत बेडेकर यांचे सोलो तबलावादन, शीतल कोलवलकर (पुणे) व शिष्यांचे कथ्थक नृत्य, कौस्तुभ देशपांडे व सहकाºयांचा ‘आनंदतरंग’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. २८ सप्टेंबर रोजी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे अमेरिकेतील शिष्य नॅश न्युबर्ट यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम होणार आहे.संगीतरसिकांसाठी मेजवानी असलेल्या अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचा समारोप दि. २९ रोजी उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी सुभाष सव्वासे यांना ‘अंबाबाई संगीत सेवा पुरस्कार‘ देण्यात येणार आहे. मधू पाटील, विनायक गुरव, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर, बाळासाहेब मिरजकर यांनी संयोजन केले आहे.