महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दर्ग्याचा यंदा ६४६ वा ऊरूस ९ मार्चपासून सुरू होत आहे. ८ मार्च रोजी रात्री संदल मिरवणूक होणार आहे. उरुसाच्या पहिल्या दिवशी ९ मार्च रोजी पहाटे चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर दिवसभर विविध संस्था व भाविकांचे गलेफ अर्पण करण्यात येणार आहेत. रात्री कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. १० मार्च रोजी शासनातर्फे तहसीलदार कार्यालयाचा गलेफ अर्पण होणार आहे. सकाळी संदलमालीचा कार्यक्रम आहे. दरम्यान, ऊरूसासाठी दि ३० रोजी दर्गा आवारात मंडप उभारणी होणार आहे. ऊरूसासाठी दर्गापंचांनी तयारी सुरू केली आहे. ऊरूसानिमित्त दि १० पासून संगीतरत्न अब्दुलकरीम खाँ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
चाैकट
परवानगीची मागणी
कोविड साथीमुळे गतवर्षी दर्गा ऊरुसास प्रशासनाने प्रतिबंध केला होता. यामुळे शेकडो वर्षात प्रथमच दर्गा ऊरुसाची परंपरा खंडित झाली. यावर्षी दर्गा ऊरुसास परवानगी देण्याची मागणी दर्गा पंचांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
फोटो : मिरासाहेब दर्गा