शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

मिरज तालुक्यात दोन्ही कॉँग्रेसची भाजपशी लढत--ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 22:22 IST

मिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत

ठळक मुद्दे : पूर्व व पश्चिम भागात समीकरणे वेगळीकाँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्टÑवादी अशी लढत

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मिरज पूर्व भागात भाजप विरुध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरुध्द काँग्रेस व स्वाभिमानी आघाडीत लढत होत आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे गट सोयीस्कर भूमिकेत आहे. मिरज पूर्व भागात काँग्रेस व राष्टÑवादी एकत्र आल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविणाºया भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत यशासाठी संघर्ष करावा लागणार आहे.मिरज पूर्व भागात काँग्रेसच्या मदन पाटील गटाचे वर्चस्व होते; मात्र पूर्व भागात पंचायत समितीच्या दहा व जिल्हा परिषदेच्या चार जागा जिंकून भाजपने येथे वर्चस्व निर्माण केले आहे. काँग्रेस व राष्टÑवादीच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी खा. संजय पाटील व आ. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केल्याने पूर्व भागातील काही ग्रामपंचायतींत भाजपची सत्ता आहे. ग्रामपंचायतींसाठी भाजपविरुध्द काँग्रेस व राष्टÑवादी अशी लढत होत आहे. बेडग, गुंडेवाडी, बोलवाड, खटाव, कदमवाडी, खंडेराजुरी, बेळंकी, सावळी, टाकळी, सलगरे, वड्डी, संतोषवाडी, पाटगाव, सिध्देवाडी, पायापाचीवाडी, सोनी या मिरज पूर्व भागात भाजप नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. खंडेराजुरीत भाजप व काँग्रेससमर्थक एकत्र येऊन निवडणूक लढवित आहेत. सोनीत घोरपडे गट व भाजप एकत्र आहेत. मात्र अन्य काही ठिकाणी घोरपडे गट भाजपविरोधात आहे. बेडग येथे भाजपमधील दोन गट विरुध्द काँग्रेस अशी लढत आहे. पूर्व भागात जि. प. व पंचायत समिती निवडणुकीत यश मिळविणाºया भाजपला काँग्रेस व राष्टÑवादीने आव्हान दिले आहे. मिरज पश्चिम भागात राष्टÑवादीचे वर्चस्व आहे. मिरज पश्चिम भागातील दुधगाव, हरिपूर, जानराववाडी, कसबे डिग्रज, कानडवाडी, खरकटवाडी, काकडवाडी, बुधगाव, बिसूर, माधवनगर, मौजे डिग्रज, माळवाडी, मानमोडी, नरवाड, नांद्रे, सावळवाडी, समडोळी, पद्माळे, रसूलवाडी, सांबरवाडी, बामणोली या निवडणुकांसाठी काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना एकत्र आल्या आहेत.काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुध्द राष्टÑवादी अशी लढत आहे. पश्चिम भागात बुधगाव व हरिपूर वगळता काँग्रेस, राष्टÑवादीच्या तुलनेत भाजपची ताकद अपुरी आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करणे भाजपसाठी कठीण ठरणार आहे.वर्चस्व टिकविण्याचे : काँग्रेससमोर आव्हानग्रामपंचायत निवडणुकांत सरपंचांची थेट मतदारांतून निवड होणार असल्याने अनेक गावांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. निवडणूक होत असलेल्या बहुसंख्य ग्रामपंचायतीत काँग्रेसचेच वर्चस्व होते; मात्र तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व टिकविण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.