शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

मिरजेत पतीकडून चाकूने भोसकून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST

फाेटाे : १८ चेतन माने मिरज : मिरजेतील टाकळी रस्त्यावर शिवम पार्क येथे चेतन आनंदा माने (वय ३२) याने ...

फाेटाे : १८ चेतन माने

मिरज : मिरजेतील टाकळी रस्त्यावर शिवम पार्क येथे चेतन आनंदा माने (वय ३२) याने दारूच्या नशेत पत्नी पूजा चेतन माने (वय २५) हिचा चाकूने पोटावर, मांडीवर, पाठीवर सपासप वार करून निर्घृण खून केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी चेतन आनंदा माने यास ताब्यात घेतले आहे.

टेलरिंगचे काम करणाऱ्या चेतन माने याचा पाच वर्षांपूर्वी जयसिंगपूर येथील पूजासोबत विवाह झाला होता. दारूच्या व्यसनामुळे त्याचे पत्नीसोबत वारंवार भांडण हाेत होते. टाकळी रस्त्यावरील शिवम पार्क येथे आई, वडील, मुलगा, दोन मुली व पत्नी असे कुटुंबीय एकत्रित राहत होते. पत्नीसोबत भांडण व मारहाणीमुळे त्यास नातेवाइकांनी आठ दिवस घरातून बाहेर पाठविले होते.

चेतन याला दारूचे व्यसन असल्याने घराचा सर्व खर्च आई-वडील भंगार गोळा करून चालवत होते. पूर्वी टेलरिंग व्यवसाय करणारा चेतन पूर्णपणे व्यसनाच्या आहारी गेला होता. रविवारी ताे घरी आला तेव्हा आई-वडील घरी नव्हते. चेतन याने दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून पत्नीसोबत भांडण काढले. रागाच्या भरात त्याने पत्नी पूजा हिच्या छातीवर, पोटावर, पाठीवर चाकूचे वार करून पलायन केले.

पूजा हिला गंभीर जखमी अवस्थेत मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मृत पूजा हिच्या मुलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सर्वात लहान मुलगी तर केवळ एक वर्षाची आहे. व्यसनाधीन चेतन याने पत्नी पूजाचा खून करून पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले. पत्नीचा खून करून पळून गेलेल्या चेतन यास रात्री उशिरा पाेलिसांनी ताब्यात घेतले.