मिरज : मिरजेत शिवसेनेतर्फे महाराणा प्रताप चौकात मंगळवारी वादग्रस्त वक्तव्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदाेलन करण्यात आले. नारायण राणे यांच्या पोस्टरला जोडे मारले.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत नारायण राणे यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश खाडे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नारायण राणे यांचे पोस्टर फाडत जोड्याने मारत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडविल्याने शिवसैनिक व पोलिसात जोरदार झटापट झाली. राणेंचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी पुतळा काढून घेतल्याने शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तालुकाप्रमुख संजय काटे, शहरप्रमुख विजय शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.