शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मिरजेत गायन, वादनाने संगीत सभेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 16:18 IST

मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत शास्त्रीय गायन, व्हायोलिन, बासरी, सतार व तबला-पखवाज जुगलबंदी रंगली. गायन, वादनाने रंगलेल्या तीनदिवसीय संगीत सभेचा

ठळक मुद्देश्रीमती रिटा देव यांनी  राग मालकंस गायिला त्यांना हार्मोनियमसाथ पंडित अनंत केमकर व तबलासाथ अंगद देसाई यांनी केली. 

मिरज : मिरजेतील मीरासाहेब दर्गा उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेत शास्त्रीय गायन, व्हायोलिन, बासरी, सतार व तबला-पखवाज जुगलबंदी रंगली. गायन, वादनाने रंगलेल्या तीनदिवसीय संगीत सभेचा समारोप झाला.

पंडित विवेक सोनार यांच्या बासरीवादनाने तिसºया दिवशी संगीत सभेचा प्रारंभ झाला. सोनार यांनी राग जोग आळविला. त्यांना उस्ताद फजल कुरेशी यांनी तबलासाथ, पंडित भवानी शंकर यांनी पखवाजसाथ केली. श्रीमती कल्पना झोरकर यांनी राग रागेश्री गायिला. त्यांना तबलासाथ माधव मोडक व हार्मोनियमसाथ सारंग सांभारे यांनी केली. उस्ताद फजल कुरेशी व पंडित भवानी शंकर यांची तबला-पखवाज जुगलबंदी रंगली. त्यांना लेहरासाथ योगेश रामदास  यांनी केली. श्रीमती रिटा देव यांनी  राग मालकंस गायिला त्यांना हार्मोनियमसाथ पंडित अनंत केमकर व तबलासाथ अंगद देसाई यांनी केली. 

संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या जमुना के तीर या प्रसिध्द भैरवीच्या ध्वनिमुद्रिका एकवित तीनदिवसीय संगीत सभेचा समारोप झाला. दर्गा सरपंच अजिज मुतवल्ली, सुरेश कपिलेश्वरी, बाळासाहेब मिरजकर, मजीद सतारमेकर, फारूख सतारमेकर यांनी संयोजन केले.

टॅग्स :musicसंगीतSangliसांगली