शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

महापालिकेत मिरज पॅटर्न ठरणार डोकेदुखी

By admin | Updated: October 29, 2015 00:13 IST

जयश्रीतार्इंसमोर खरे आव्हान : सांगली, मिरज, कुपवाडच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत

शीतल पाटील --सांगली  --ना नेता, ना पक्ष, केवळ सोयीचे राजकारण; हा अजेंडा असलेल्या ‘मिरज पॅटर्न’ची महापालिकेत धास्ती कायम आहे. त्यातच माजी मंत्री मदन पाटील यांच्या पश्चात महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मदनभाऊंच्या हयातीतच सत्ताधारी गटाची शकले झाली आहेत. त्यांच्या पत्नी जयश्रीतार्इंनी महापालिकेचे नेतृत्व स्वीकारले तरी, भविष्यात पदाधिकारी निवडीत त्यांचा शब्द कितपत प्रमाण मानला जाईल, त्यांच्या आदेशानेच कारभार होईल का, याविषयी साशंकता आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाच्या पलीकडे आम्हाला कोणी नेता नाही, की पक्ष नाही, असे मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक उघडपणे सांगतात. सांगलीत आल्यावर मात्र पक्ष, नेता याची भाषा सुरू होते. त्याला कारणही आहे. मिरजेतील बहुतांश नगरसेवक स्वयंभू आहेत. त्यांचा प्रभागात वरचष्मा आहे. ते कोणत्याही पक्षातून निवडून येऊ शकतात. सांगली व कुपवाडची स्थिती मिरजेच्या नेमकी उलटी आहे. या दोन्ही शहरातील नगरसेवकांना स्वकर्तृत्वाबरोबरच नेता, पक्षाचाही आधार घ्यावा लागतो. त्याशिवाय त्यांची डाळ शिजत नाही. म्हणूनच सांगली, कुपवाडमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांना घरी बसावे लागले आहे. तसेच मिरजेतून मात्र तीच ती मंडळी वारंवार महापालिकेत निवडून येत आहेत. यामागे त्यांचे काम नाकारून चालणार नाही. जास्तीत जास्त निधी आपल्या प्रभागात खर्च करण्यात ही मंडळी तरबेज आहेत. काँग्रेसमधील दहा नगरसेवकांचा गट पतंगरावांचा आदेश प्रमाण मानत होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेस अल्पमतात आली होती. त्यातच मदनभाऊंचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या गटाचे काय होणार, हा प्रश्न आहेच. मदनभाऊंच्या गटातही सारे काही आलबेल नाही. एकमेकांचा काटा काढण्यात या गटातील नगरसेवकही तरजेब आहेत. त्यातून दोन ते तीन गटही निर्माण झाले आहेत. एकमुखी कारभाराला मदनभाऊंच्या हयातीतच तडा गेला होता. त्यांच्या पश्चात ही दरी आणखी रूंदावण्याची चिन्हे आहेत. आगामी चार महिन्यात महापौर, उपमहापौर निवड होणार आहे. त्यात सर्वात मोठी भूमिका मिरज पॅटर्नची राहणार आहे. एकमेकांना साहाय्य करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे कोणाचा बळी जाणार व कोण पदाची पालखी वाहणार, हे लवकरच कळेल.जयंतरावांचा आधारमदनभाऊ गटाची सत्ता महापालिकेत कायम ठेवायची असेल, तर या गटाला राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील गटाची साथ घ्यावी लागणार आहे. खुद्द जयंतरावांनी, जयश्रीतार्इंच्या भविष्यातील राजकीय निर्णयप्रक्रियेत मी असेन, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यात मदनभाऊंशी त्यांचे सूत जुळले होते. जिल्हा बँक, बाजार समितीप्रमाणेच आता महापालिकेतही मदनभाऊ गट व राष्ट्रवादी एकत्र आणण्याची गरज असल्याचे काँग्रेसचेच नगरसेवक जाहीरपणे बोलू लागले आहेत. याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचे महापालिकेत ४० नगरसेवक असले तरी, जयश्रीतार्इंचा शब्द अंतिम मानणारे किती, याची आकडेमोड सुरू आहे. भविष्यात काही दगाफटका झाला तरी, मदनभाऊ गट व राष्ट्रवादी एकत्र सत्ता काबीज करू शकतात, अशी गणितेही मांडली जात आहेत. दबदबा संपलामहापालिकेच्याच नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणात मदन पाटील यांचा मोठा दबदबा होता. त्यांच्या नजरेचीच धास्ती नगरसेवकांना असायची. फार्महाऊस असो अथवा विजय बंगला, पदासाठी आदळाआपट करणारे नगरसेवक केवळ त्यांनी नजर टाकली तरी शांत होत. महापालिकेत ते निर्णय घेतानाही परिणामांचा विचार करीत नसत. कोणताही निर्णय चुकला तर, तो बिनदिक्कतपणे मागे घेण्याची हिंमतही त्यांच्यात होती. याउलट जयश्रीतार्इंचा स्वभाव आहे. मदनभाऊ आक्रमक होते, तर जयश्रीताई मवाळ आहेत. कार्यकर्त्यांना ताकद देण्याची कसब त्यांच्याकडे आहे. म्हणून आजही मदनभाऊंचा केवळ जयश्रीतार्इंमुळेच टिकून आहे. नगरसेवकांना सातत्याने धाकात ठेवावे लागते. हा धाक कायम ठेवणे जयश्रीतार्इंना कितपत जमेल, हा प्रश्न आहे.