शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अल्पवयीन पत्नी गर्भवती; पतीस २० वर्षांची सक्तमजुरी, इस्लामपूर न्यायालयाने सुनावली शिक्षा

By हणमंत पाटील | Updated: January 23, 2024 13:18 IST

इस्लामपूर : परजिल्ह्यातून वाळवा तालुक्याच्या एका गावातील नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहिलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करून बलात्कार ...

इस्लामपूर : परजिल्ह्यातून वाळवा तालुक्याच्या एका गावातील नातेवाइकांकडे शिक्षणासाठी राहिलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करून बलात्कार केल्याच्या खटल्यातील आरोपीस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी २० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. वैभव नंदकुमार लोंढे (२४, रा. बोरगाव, ता. वाळवा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी धरून शिक्षा दिली. त्याने दंडाची रक्कम न भरल्यास त्याला तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. आरोपीविरुद्ध फिर्याद देतेवेळी पीडित मुलगी ही पाच महिन्यांची गरोदर राहिली होती. फिर्यादीतर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिले.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी वैभव लोंढे याने अल्पवयीन पीडित मुलीशी मैत्री झाल्यानंतर तू मला खूप आवडतेस, आपण दोघे लग्न करूया, असे वरचेवर म्हणत होता. त्यावेळी पीडित मुलगीही त्याला मी अजून लहान आहे, आपण असे करणे योग्य नाही, असे समजावून सांगत होती.मात्र तरीही आरोपी वैभव लोंढे याने तिला एप्रिल २०२० मध्ये भेटण्यासाठी बोलावून घेतले. तेथून त्याने मुलीस दुचाकीवर घेऊन स्वत:च्या घरी डांबून ठेवले. मोबाइल काढून घेतला. मला येथे राहायचे नाही, हे सांगितल्यावर त्याने माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर तुझी बदनामी करेन, तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही, असे धमकावले. भीतीमुळे पीडित मुलगी तेथेच थांबली. १४ एप्रिल २०२० रोजी लोंढे याने कलंकेश्वर मंदिरात मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.चारित्र्याचा संशय घेऊन मारहाणपीडितेच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची वर्दी पोलिसात दिल्यानंतर वैभव हा पीडितेस चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण करत होता. हा त्रास असह्य झाल्यावर पीडित मुलीने कुटुंबीयांशी संपर्क साधत पोलिसात धाव घेतली. सहायक निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी गुन्ह्याचा तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील रणजित पाटील यांनी ४ साक्षीदार तपासले. सर्वांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयाने शिक्षा सुनावली.पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे, हवालदार सुनील पाटील, संदीप शेटे यांनी खटल्याच्या कामकाजात सरकार पक्षाला मदत केली.

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालयislampur-acइस्लामपूर