शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औषध खरेदीत लाखोंचा घोटाळा

By admin | Updated: May 31, 2016 00:28 IST

नगरसेवकांचा आरोप : प्रभाग बैठकीत आरोग्य विभाग धारेवर

सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डासप्रतिबंधक व इतर औषध खरेदीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमवारी प्रभाग समिती दोनच्या बैठकीत करण्यात आला. पाचशे रुपयाला पाच लिटरचे औषध दीड हजार रुपयांनी खरेदी केले जात असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. सभापती मृणाल पाटील यांनी औषध खरेदीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रभाग समिती क्रमांक दोनची बैठक सभापती मृणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तब्बल सात महिन्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या कारभाराचे वाभाडे काढले. डास व इतर औषधांवर महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जात आहेत. बाजारात ही औषधे साडेचारशे ते साडेपाचशे रुपयांना येतात. महापालिकेकडून हीच औषधे दीड हजार रुपयांना खरेदी केली जात आहेत, असे नगरसेवक युवराज गायकवाड, राजू गवळी यांनी सांगितले. औषध खरेदीत लाखो रुपयांचा चुना लावला जात असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सभापती पाटील यांनी अखेर आरोग्य विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. सुलभ शौचालये, सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अ‍ॅसिड खरेदी केले जाते. पण गेल्या काही वर्षापासून पालिकेने अ‍ॅसिडच खरेदी केलेले नाही. त्यामुळे शौचालये निर्जंतुकीकरण न झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. प्रभाग समिती दोनच्या कार्यक्षेत्रात मोकाट कुत्री व डुकरांवर कारवाई केली जात नाही. अनेक हॉटेल व चिकन सेंटरकडे महापालिकेचा परवानाच नाही. बेकायदा सेंटरमधील वेस्टेज कचरा कुंडीत टाकला जात आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहेत. याप्रकरणी आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोपही करण्यात आला. प्रभाग समितीकडे नवीन २५ व दुरुस्त केलेले २२ अशी ४७ कंटेनर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. पण नगरसेवकांनी आरोग्य विभागाचा दावा फेटाळत प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अपुरे कंटेनर असल्याचे सांगितले. त्यावर सभापती पाटील यांनी नवीन व दुरुस्त केलेले ४७ कंटेनरची स्थळनिहाय यादी सादर करण्याचे आदेश दिले. प्रभागात १२५ कंटेनर आहेत. त्यापैकी ४५ कंटेनरमधीलच कचरा उचलला जातो. इतर कंटेनरमधील कचरा तसाच पडून असतो. गटारीतील गाळ भरण्यासाठी गाड्यांची कमतरता आहे. गाळ भरण्यासाठी घंटागाडीचा वापर केला जात आहे. त्यामुळे घंटागाड्या खराब होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांच्या पगारावर डल्ला--नगरसेवक युवराज गायकवाड यांनी अमरधाम स्मशानभूमीत अपुरे कर्मचारी असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित केला. स्मशानभूमीत कर्मचारी कमी असल्याने स्वच्छता होत नाही. नागरिकांनाही सेवा दिली जात नाही. पालिकेच्या रेकॉर्डवर दहा कर्मचाऱ्यांची स्मशानभूमीत नियुक्ती आहे. पण केवळ तीनच कर्मचारी कामावर असतात. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सात कर्मचाऱ्यांचा पगार लाटला जात असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला.